Home विदेश coronavirus curfew: कुत्र्याचा पट्टा घालून पतीला फिरवत होती पत्नी; 'कारण' ऐकाल तर...

coronavirus curfew: कुत्र्याचा पट्टा घालून पतीला फिरवत होती पत्नी; ‘कारण’ ऐकाल तर हैराण व्हाल! – woman takes her husband out on a leash during curfew, claims she is walking her dog


टोरंटो: कॅनडात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पत्नीने आपल्या पतीला कुत्र्याचा पट्टा घालून रस्त्यावर फिरवत होती. हे दृष्य पाहून गस्तीवर असलेल्या पोलिसांना मोठा धक्काच बसला. त्यांनी या जोडप्यावर कारवाई करत दंड ठोठावला. पत्नीने पतीला श्वानासारखी वागणूक देण्याचे कारणही अजब होते. पोलिसांनी हे कारण ऐकल्यानंतर तेही चक्रावून गेले. सध्या या जोडप्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाच्या क्युबेकमध्ये चार आठवड्यांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत आहे. या दरम्यान नागरिकांना लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या, पाळीव श्वानाला घराबाहेर नेण्याची परवानगी देण्यात आली होती.

वाचा: काळजी घ्या! करोनानंतरचा न्यूमोनिया घातक; संशोधकांचा इशारा

वाचा: करोनाचे थैमान: अमेरिकेत माणसांनंतर गोरिला माकडांनाही संसर्गाची लागण

प्रशासनाच्या या नियमांचा आधार घेत या महिलेने आपल्या पतीच्या गळ्यात पाळीव श्वानासाठी असलेला पट्टा बांधून रस्त्यावर फिरवू लागली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला शेरब्रुकमधील किंग स्ट्रीट ईस्ट भागात आपल्या पतीला घेऊन फिरत होती. त्यावेळी संचारबंदीची वेळ सुरू होऊन जवळपास तासभर झाला होता. त्याच वेळी पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता तिने आपण आपल्या श्वानासह फिरत असल्याचे स्पष्टीकरण दिले. या महिलेच्या उत्तराने पोलिसांना धक्काच बसला. हे जोडपे पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा: अमेरिकेत करोनाचे मृत्यू तांडव; एकाच दिवसात चार हजारांहून अधिक बळी

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिलेला आणि तिच्या पतीला पोलिसांनी दंड ठोठावला. या दोघांना जवळपास दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागला. कॅनडामध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत १७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी मोडणाऱ्यांना नागरिकांना दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत ७५० जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments