Home विदेश Coronavirus Death Toll in U.S. Reaches More Than 40 Thousand : अमेरिकेत...

Coronavirus Death Toll in U.S. Reaches More Than 40 Thousand : अमेरिकेत करोनामुळे ४० हजारजणांनी प्राण गमावले


वॉशिंग्टन: करोनाचे थैमान अमेरिकेत सुरू असून जागतिक महासत्तेने या संसर्गासमोर हात टेकले असल्याचे चित्र आहे. रविवारीही अमेरिकेत मृतांच्या संख्येत वाढ झाली असून करोनाने आतापर्यंत ४० हजार बळी घेतले आहेत. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने वाढत जाणाऱ्या मृत्यूंमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेत सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अमेरिकेत सात लाख ५० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. न्यूयॉर्क राज्याला करोनाचा मोठा फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोनाबाधितांची संख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात पोहचली आहे. तर, १८ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क राज्यानंतर न्यूजर्सीमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. न्यूजर्सीमध्ये ८५ हजाराहून अधिकजणांना संसर्ग झाला असून ४ हजारजणांचा मृ्त्यू झाला आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. एकीकडे मृत्यूचे तांडव सुरू असताना अमेरिकेत ७० हजार बाधितांनी करोनाला मात दिली आहे.

वाचा:
‘या’ देशाने लॉकडाउन न करता करोनाला दिली मात

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना संसर्गाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. चीनच करोनाच्या संसर्गासाठी जबाबदार असल्याचे समोर आल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली. चीनने करोनाच्या संसर्गाबाबत अमेरिकेला अंधारात ठेवले असून सुरुवातीला कोणतेही सहकार्य केले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

आणखी वाचा:
करोनाचा हाहाकार: अमेरिकेतील लॉकडाऊन संपणार?
जगभरात नोव्हेंबरमध्ये करोनाची दुसरी लाट येणार?

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments