Home महाराष्ट्र coronavirus from animals: करोनामुक्तांच्या घरातील प्राण्यांमधील संसर्ग तपासणार - check for infection...

coronavirus from animals: करोनामुक्तांच्या घरातील प्राण्यांमधील संसर्ग तपासणार – check for infection in pets


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना आजारावर मात करून बरे झालेल्या व्यक्तींच्या घरी असलेल्या पाळीव प्राण्यांचाही वैद्यकीय अभ्यास करोना आजाराच्या अनुषंगाने केला जाणार आहे. त्यातून या आजाराचा संसर्ग माणसाकडून प्राण्यांना वा प्राण्यांकडून माणसाला होऊ शकतो का, याचे अनुमान लावता येईल, असा विश्वास पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. उदय ककरु यांनी व्यक्त केला. केईएम रुग्णालयामध्ये मिलेनिअयम इंडिया एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहयोगाने हा अभ्यास करण्यात येणार आहे.

करोनाचा संसर्ग सर्वप्रथम झालेल्या चीनमधील वुहान शहरामध्ये तो वटवाघुळांच्या माध्यमातून पसरला, असा दावा करण्यात येतो. मागील काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारचे ताप, सार्स, बर्डफ्लू, मंकी फिव्हर आदी साथींवेळी प्राणी आणि मनुष्य या दोघांमधील आजार आणि या आजारांचा एकमेकांकडे होणारा संसर्ग दृष्टीने शक्यता तपासण्यात आल्या. मात्र प्रत्येक साथींचा जोर उतरल्यानंतर हा विषय बाजूला पडला. करोनाच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज्यात अशा प्रकारचा अभ्यास अद्याप झालेला नाही. त्यामुळे या अभ्यासामध्ये काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढे येण्याची शक्यता आहे.

आजारांच्या बदलत्या स्वरूपामध्ये प्राण्यांकडून मानवाला आणि मानवाकडून प्राण्यांना होणाऱ्या आजारांच्या शक्यता लक्षात घ्यायला हव्यात. त्या लक्षात न घेतल्यामुळे या विषयाच्या संदर्भातील संशोधनाला चालना मिळालेली नाही. झुनॉटिक आजारांचे मध्यवर्ती सूत्र घेऊन दिल्ली आणि मुंबई येथील केईएम रुग्णालयामध्ये प्रत्येक वर्षी चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. यावर्षीही या चर्चासत्रामध्ये करोना संसर्गाच्या विविध शक्यतावर चर्चा केली जाणार आहे.

चाचणी आणि उपाययोजना

प्राण्यांमध्ये अँटीबॉडी किंवा रक्ताची चाचणी घेतली जाणार नसून त्यांच्या नाकातील द्रवाचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग आहे का, हे तपासण्यात येईल. मांजर आणि कुत्र्यांमध्ये करोनाचा संसर्ग असल्याची अतिशय तुरळक उदाहरणे पुढे आली आहे. हा संसर्ग प्राण्यांमध्ये असला, तरी प्राण्यांची स्वतःची विकसित प्रतिकारशक्ती असते, त्यामुळे हा संसर्ग अतिशय सौम्य प्रकारचा असेल, अशी शक्यता पशुवैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र माणसांप्रमाणे प्राण्यांचा बाहेरचा वावर लक्षात घेता त्यांचेही करोनाच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी वैद्यकीय उपाययोजना करायला हव्यात, त्यांचे पाय धुणे, अंग स्वच्छ पुसून घेण्यामध्ये नियमितता हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

जनजागृतीचा अभाव

माणसाला १४५ प्रकारचे आजार हे संसर्गाने होतात. त्यापैकी ८१७ म्हणजे ५८ टक्के आजार हे झुनॉटिक स्वरुपाचे असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये इबोला व्हायरस, सार्स, बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू या आजारांसाठी अनेक व्यक्ती रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. मात्र तरीही या आजारांबद्दल पुरेशी जनजागृती केली जात नाही.

एकत्रित विचार हवा

मनुष्य आणि प्राणी यांचा आजारांसंदर्भात परस्परसंबंध तपासताना रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे, मांजरी, मोकळ्या ठिकाणी असलेल्या म्हशी, इतर प्राण्यांचा वावरही सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एम. एस. मणिपाल यांनी सांगितले. करोनानंतरच्या जगामध्ये प्राणी आणि मानवी आरोग्याचा सकल एकत्रित विचार करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातून अधोरेखित होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ind vs Aus highlights: Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलियात भारत ‘अजिंक्य’; यजमानांचा घरच्या मैदानावर इतिहासातील मोठा पराभव – australia Vs India 4th Test...

ब्रिस्बेन: India win at Brisbane अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय...

msedcl bill recovery latest news: MSEDCL Bill Recovery: लॉकडाऊन काळातील सहानुभूती संपली!; वीज ग्राहकांना महावितरण देणार ‘शॉक’ – msedcl will cut off power supply...

मुंबई:वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत....

Recent Comments