Home देश पैसा पैसा Coronavirus Highest Cases in Maharashtra: सहा लाख रुपयांपर्यंत विमा; 'करोना'चे सर्वाधिक दावे...

Coronavirus Highest Cases in Maharashtra: सहा लाख रुपयांपर्यंत विमा; ‘करोना’चे सर्वाधिक दावे महाराष्ट्रातच


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना काळात करण्यात येणाऱ्या विमा दाव्यांची संख्या वाढत असून, आजपावेतो २८१ कोटी रुपयांच्या दाव्यासाठी अठरा हजारांहून अधिक दावे दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या दाव्यांमध्ये सर्वाधिक दावे (८,९५०) महाराष्ट्रातील असून, त्यापाठोपाठ नवी दिल्ली-एनसीआरचा ३,४७० दाव्यांसह दुसरा क्रमांक लागतो.

विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरी भागांमध्ये सरासरी दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे आणि ग्रामीण तसेच निमशहरी भागांमध्ये सरासरी ५०,००० ते ७५,००० रुपयांपर्यंतचे कोव्हीड-१९ चे दावे प्राप्त झाले आहेत. गंभीर असणाऱ्या करोनाबाधितांना आयसीयूमध्ये भरती केल्यास सहा लाख रुपयांपर्यंतचे दावे करण्यात येत असल्याचेही विमा कंपन्यांनी स्पष्ट केले. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दावा करण्यात आलेली रक्कम हॉस्पिटलांमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत कमीच आहे. कारण, केरळ आणि तेलंगणसारख्या राज्यांमधील सरकारी हॉस्पटलांमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

आता वस्तूंवर संबंधित देशाचं नाव असणं अनिवार्य
करोना विमा संरक्षण देणाऱ्या कंपन्यांनी कॅशलेस सुविधेबाबत दोन तासांत अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) दिले होते. करोनाचे दावे तातडीने निकाली काढण्यासाठी इर्डाने मार्गदर्शक तत्वे जाणारी जारी केली होती. देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णांवर सरकारी हॉस्पिटलांव्यतिरिक्त खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. असे असले, तरी करोनाचे उपचार घेत असताना आरोग्यविम्यासाठी दावा करणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प असल्याचे आढळून आले आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटीने (एनएचए) दिलेल्या माहितीनुसार देशभरात करोनाच्या एकूण आढळलेल्या रुग्णांपैकी केवळ १० टक्केच रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे आढळून आले होते.

…तर तुमचा विमा प्रिमियम वाढणार; ‘ही’ आहेत त्यामागची कारणे
इर्डाने दिलेल्या निर्देशानुसार आरोग्य यंत्रणेनुसार कंपन्यांनी करोनाचे दावे तातडीने निकाली काढावे. थर्ड पार्टी अॅशुरन्स किंवा कॅशलेस याबाबत तात्काळ निर्णय द्यावा, असे इर्डाने म्हटलं आहे. थर्ड पार्टी अॅशुरन्सबाबत कंपन्यांनी मार्गदर्शक तत्वे जारी करावी. करोना दाव्यांचा निपटारा करण्या काढण्यासाठी २४ तास यंत्रणा सुरु ठेवण्याचे स्पष्ट आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले होते.

शॉर्ट टर्म विमा पॉलिसी येणार

देशातील करोनाचे वाढते संकट पाहता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) विमा कंपन्यांना कमी कालावधीसाठी आरोग्य विमा जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. या विमा पॉलिसीअंतर्गत करोना विषाणूच्या विरोधात संरक्षण दिले जाणार आहे. इर्डाने सर्व विमा कंपन्यांना कोव्हिड २०१९साठी शॉर्ट टर्म हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत सादर करण्याचीही परवानगी दिली आहे. इर्डाने दिलेल्या सूचनेनुसार कमी कालावधीच्या पॉलिसीचा किमान कालावधी तीन महिने आणि कमाल कालावधी अकरा महिन्यांपर्यंत असावा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपये दंड – aurangabad municipality civic chief astik kumar pandey fined 5000 rupees to project director of rural...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिशा समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांसाठी प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून पुस्तके आणल्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय...

CSK: चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका – aakash chopra says chennai express now became goods train

नवी दिल्ली:IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी...

Recent Comments