Home शहरं अहमदनगर coronavirus in ahmednagar: व्यापाऱ्यांनी घेतला करोनाचा धसका; 'अॅनलॉक'मध्येही हा बाजार 'लॉक'! -...

coronavirus in ahmednagar: व्यापाऱ्यांनी घेतला करोनाचा धसका; ‘अॅनलॉक’मध्येही हा बाजार ‘लॉक’! – wholesale market in ahmednagar will be closed for three days


नगर: ‘ लॉकडाऊन ’ काळामध्येही ‘ अनलॉक ’ असणारे नगरच्या मध्यवर्ती भागातील आडतेबाजार, दाळमंडई, दाणेडबरा, तपकीर गल्ली भागातील व्यापारी पेठेने ‘करोना’चा धसका घेतला आहे. किराणा मालाची होलसेल दुकाने असणारा हा भाग सुद्धा नगरमध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने २८ ते ३० जून असे तीन दिवस बंद ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता संबंधित व्यापारी असोसिएशनेच तसा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला आहे.

वाचा: ‘लॉकडाऊन’ असताना ‘ती’ महिला साई मंदिरात; फेसबुक लाइव्ह केले!

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नगरमध्ये पहिला करोना बाधित रुग्ण सापडला होता. तर, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी होती. अहमदनगर शहरामध्ये आडते बाजार, दाळमंडई, तपकीर गल्ली, दाणेडबरा हा भाग म्हणजे किराणा मालाची होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लॉकडाऊन काळामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यातील बाजारपेठ बंद असताना ही बाजारपेठ सुरू होती. आता मात्र नगर शहरातच करोनाचा वेगाने फैलाव होऊ लागल्यामुळे या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीच पुढे येऊन आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: करोनाची धास्ती! विलगीकरण कक्षात युवकाची आत्महत्या

नगर शहरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनावर जास्त तणाव येत आहे. त्यामुळे आता मार्केटयार्ड, आडतेबाजार, दाळमंडई, तपकीरगल्ली, दाणेडबरा या परिसरातील व्यापार पेठ २८ ते ३० जून असे सलग तीन दिवस बंद ठेवली जाणार आहे. तसे पत्रच दि अहमदनगर आडते बाजार मर्चन्टस् असोसिएशनने काढले आहे. त्यामुळे आता ‘ लॉकडाऊन ’ काळात ‘अनलॉक’ असणारी अत्यावश्यक सेवेची ही बाजारपेठ ‘लॉकडाऊन’ होणार आहे.

आज सकाळी आढळले १५ बाधित

नगर जिल्ह्यामध्ये करोना रुग्णवाढीचा वेग हा सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. आज सकाळी नगर जिल्ह्यामध्ये १५ करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये नगर शहर ६, श्रीगोंदा तालुका ३, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी १ आणि राहाता तालुक्यात २ जणांचा समावेश आहे.

वाचा: करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी केलं मान्यSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Recent Comments