Home शहरं अहमदनगर coronavirus in ahmednagar: coronavirus in ahmednagar : मस्तच! करोनाला हरवून ९० वर्षांच्या...

coronavirus in ahmednagar: coronavirus in ahmednagar : मस्तच! करोनाला हरवून ९० वर्षांच्या आजीबाई परतल्या घरी – miracle 90-year-old woman recovers from coronavirus in ahmednagar


अहमदनगर: नगर शहरातील ९० वर्षांच्या आजीबाईंनी करोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. या आजीबाईंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आजीबाईंनी उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही माझ्यावर चांगले उपचार केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘डॉक्टर्स डे’ च्या दिवशी रुग्णांकडून मिळालेली ही पावती या डॉक्टरांनाही मनात जपून ठेवावीशी वाटली.

२२ जून रोजी नगर शहरातील या आजीबाईंना त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव आला. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना २-३ दिवस आयसीयू मध्ये ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आणि कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.

Bhiwandi Kabrastan : भयावह परिस्थिती! ‘या’ कब्रस्तानांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही

नगरमध्ये आता करोनाचा वेगाने फैलाव होऊ लागला असून जिल्ह्यात काल दुपारी पुन्हा १९ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नगर शहरातील ७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ नगर महापालिकेच्या हद्दीमध्येच सापडलेल्या करोनाबाधितांची संख्या १६० झाली असून त्यापैकी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७८ आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे नगर शहरामध्ये नालेगाव, तोफखाना, सिद्धार्थनगर व आडतेबाजार हे चार कंटेन्मेंट झोन केले आहे. मुख्य बाजारपेठेचा परिसर सुद्धा कंटेन्मेंट व बफर झोनमध्ये आला असल्यामुळे ती देखील बंद आहे. मात्र, त्यानंतरही नगरमधील इतर भागातील गर्दी कमी होत नसल्याचे प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेकजण कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता, तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरताना आढळत आहेत. त्यामुळे आता विनाकारण फिरणे टाळा अन्यथा सक्तीने लॉकडाऊन करण्याचा इशाराच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच चेहऱ्यावर मास्क घालून घराबाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत करोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

‘गोल्डन बाबा’चा मृत्यू, धमकी-खंडणीचे अनेक गुन्हे होते दाखल

पुणे हादरले; भररस्त्यात सपासप वार करून रिक्षाचालकाची हत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad rain: ‘हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली ‘ही’ मोठी घोषणा – hyderabad had not experienced such heavy rainfall in...

हैदराबादः महाराष्ट्रसोबत तेलंगणमध्ये ( hyderabad rain ) पावसाने प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत घोषित करण्यात...

Nawab Malik: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ – ncp leader nawab malik targets devendra fadnavis

मुंबई: 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी...

Recent Comments