Home शहरं अहमदनगर coronavirus in ahmednagar: RSS म्हणतेय, आम्हाला द्या 'करोना' कामाची जबाबदारी! - rss...

coronavirus in ahmednagar: RSS म्हणतेय, आम्हाला द्या ‘करोना’ कामाची जबाबदारी! – rss volunteers heading for mission covid in ahmednagar


अहमदनगर:अहमदनगर पालिका हद्दीत करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या कामाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत व्हावी, या उद्देशाने संघ पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी थेट महापालिका गाठत करोना कामाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. पुणे येथील रेड झोनमध्येही आरएसएसचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून तेथील महापालिका प्रशासनाला मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे नगरमध्ये काम करण्याची इच्छा स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. याकाळात नागरिकांना मदत करण्याचे काम तेथील स्थानिक जिल्हा, महापालिका प्रशासन करीत आहे. नगरमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन अहोरात्र झटत आहे. करोना सोबत लढा देणाऱ्या प्रशासनाला मदत व्हावी यासाठी मदत व्हावी, यासाठी आता संघ स्वयंसेवक पुढे आले आहेत. नगर येथे सोमवारी संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना भेटून करोना संदर्भातील कामाची जबाबदारी द्यावी, अशी विनंती केली आहे. आता याबाबत महापालिका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मार्फत गरजूंसाठी गेल्या दोन महिन्यांपासून किराणा किट देण्यात येत आहे. याशिवाय परराज्यातील मजुरांना मूळगावी पाठवण्यासाठी मदत करण्यात येत आहे. आता संघाने अधिकृतरित्या जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE: नाकावाटे दिली जाणार कोरोना लस, नागपूरसह देशभरात 4 ठिकाणी चाचणी सुरू | Coronavirus-latest-news

7:36 am (IST) कोरोना लस आता नाकावाटे देण्याबाबत देशात चार ठिकाणी चाचणी सुरू राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटल मध्ये चाचणी...

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Recent Comments