Home शहरं औरंगाबाद coronavirus in aurangabad: औरंगाबादमध्ये करोनामुळे ८५ जणांनी गमावला जीव - coronavirus updates:...

coronavirus in aurangabad: औरंगाबादमध्ये करोनामुळे ८५ जणांनी गमावला जीव – coronavirus updates: 47 new cases in aurangabad district


औरंगाबाद:औरंगाबाद शहर परिसरात व जिल्ह्यामध्ये नव्याने ४७ करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १६९६ झाली आहे. तसेच शहरातील ७४ वर्षीय करोना बाधिताचा बुधवारी (३ जून) सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या मृत्यूची संख्या ८५ झाली आहे. दरम्यान, १०८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोनाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ तीन उपाय!

नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये जसवंतपुरा येथील १, संजय नगर, मुकुंदवाडी १, खोकडपुरा २, अजिंक्य नगर १, समता नगर २, समृद्धी नगर, एन-४ सिडको १, जय भवानी नगर १, लेबर कॉलनी २, मिल कॉर्नर ४, हमालवाडी, रेल्वे स्टेशन १, भावसिंपुरा २, शिवशंकर कॉलनी ५, पिसादेवी रोड १, कटकट गेट १, सिल्लेखाना, नूतन कॉलनी १, बारी कॉलनी १, उल्कानगरी १, एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको १, शरीफ कॉलनी १, कैलास नगर ४, स्वप्न नगरी, गारखेडा परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, पुंडलिक नगर रोड, गारखेडा १, विद्यानिकेतन कॉलनी १, सुराणा नगर २, अन्य ३ आणि यशवंत नगर, पैठण ३, अब्दुलशहा नगर, सिल्लोड १ अशा रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्ण आहेत.

खासगी रुग्णालयात सकाळी मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार सिडको परिसरातील ७४ वर्षीय करोना बाधित पुरूष रुग्णाचा बुधवारी (३ जून) सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६८, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १६, तर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ८५ करोना बाधितांनी उपचारादरम्यान जीव गमावल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोना संक्रमणाहून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, मृत्युदरातही घट!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Janet Yellen For Treasury Secretary Financial Minister Of USA – ‘या’ होणार अमेरिकेच्या अर्थमंत्री; मनमोहन सिंग आणि त्यांच्यात ‘ही’ समान बाब

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांच्या या मंत्रिमंडळात अमेरिकेतील प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न...

Balasaheb Thorat on ED: ‘भाजपशासित राज्यांत ईडीच्या अशा कारवाया का होत नाहीत?’ – why ed not takes action on bjp ruled states, asks congress...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे कारवाईचे तीव्र पडसाद सत्ताधारी गोटात उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपवर सुडाच्या राजकारणाचा...

Recent Comments