Home शहरं औरंगाबाद coronavirus in aurangabad: Coronavirus In Aurangabad मुंबई, ठाणे, पुण्यानंतर आता 'या' जिल्ह्यात...

coronavirus in aurangabad: Coronavirus In Aurangabad मुंबई, ठाणे, पुण्यानंतर आता ‘या’ जिल्ह्यात करोनाची स्थिती गंभीर – aurangabad reports 249 new cases tally crosses 6k mark


औरंगाबाद :रांजणगाव येथील ५० वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ६९ वर्षीय महिला, अविष्कार कॉलनीतील ५५ वर्षीय पुरुष, हर्षनगर येथील ७० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४७ वर्षीय पुरुष, तर एन ११ परिसरातील ७१ वर्षीय महिला या सहा करोनाबाधितांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत २१७, तर जिल्ह्यात २७७ बाधितांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. त्याचवेळी आज दुपारपर्यंत २४९ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या ६०३१ झाली आहे. ( Coronavirus In Aurangabad )

वाचा: ब्युटिशियन करोना पॉझिटिव्ह; ‘त्या’ लग्नाचा मेकअपच उतरला!

रांजणगाव येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णास २८ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी हा रुग्ण करोना बाधित असल्याचे चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान श्वसनविकार, न्युमोनिया, सायटोकाइन स्टॉर्म, कोएगुलोपथी, सेप्सिस आदींमुळे रुग्णाचा बुधवारी (१ जुलै) मृत्यू झाला. अविष्कार कॉलनी, एन-सहा परिसरातील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास २७ जून रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान न्युमोनिया, श्वसनविकार, सायटोकाइन स्टॉर्म, कोएगुलोपथी आदींमुळे रुग्णाचा बुधवारी दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी मृत्यू झाला. बेगमपुरा येथील ६९ वर्षीय महिला रुग्णास २६ जून रोजी दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्युमोनिया, श्वसनविकार, मधुमेह आदींमुळे रुग्णाचा बुधवारी दोन वाजता मृत्यू झाला. हर्षनगर येथील ७० वर्षीय महिला रुग्णास २९ जून रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण हा बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. श्वसननिकार, न्युमोनिया आदींमुळे रुग्णाचा मृत्यू झाला. सिल्लोड येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णास २९ जून रोजी दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे निदान दुसऱ्या दिवशी झाले होते. उपचारादरम्यान न्युमोनिया, श्वसनविकार, सायटोकाइन स्टॉर्म, कोएगुलोपथी, सेप्सिस, मधुमेह आदींमुळे रुग्णाचा बुधवारी चार वाजता मृत्यू झाला. एन-११, सुभाषचंद्र बोस नगर येथील ७१ वर्षीय कॅन्सरग्रस्त महिला रुग्णास १८ जून रोजी दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले होते. श्वसनविकार, न्युमोनिया, सायटोकाइन स्टॉर्म, कोएगुलोपथी आदींमुळे रुग्णाचा बुधवारी सायंकाळी सातला मृत्यू झाला.

वाचा: करोनाला वेळीच वेसण; सिंधुदुर्गात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

दुपारी आढळले ४३ बाधित

जिल्ह्यात गुरुवारी दुपारी आणखी ४३ बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीतील तिघांचा, तर ग्रामीण भागातील ४० बाधितांचा समावेश आहे. शहर परिसरातील बाधितांमध्ये राहुल नगर येथील २, जयभवानी नगर १ येथील रहिवाशांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बाधितांमध्ये करमाड येथील १, चिंचबन कॉलनी, बजाज नगर ३, छत्रपती नगर, बजाज नगर २, द्वारकानगरी, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी २, इंदिरा नगर, पंढरपूर, बजाज नगर २, खंडोबा मंदिर, बजाज नगर १, गाडगेबाबा गेट, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ६, सिंहगड सोसायटी, बजाज नगर ३, क्रांती नगर, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर ४, वडगाव, बजाज नगर ४, रांजणगाव, बजाज नगर १, स्नेहांकित सोसायटी, बजाज नगर १, साऊथ सिटी, बजाज नगर ३, सिडको, बजाज नगर १, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर ४ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

वाचा: गणपती बसणार नाहीच; ‘लालबागचा राजा’चं मंडळ ठामSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

police arrest animal thieves gang in aurangabad: जनावरे चोरणारी टोळी गजांआड – aurangabad crime news , police arrested gang who thieves animal

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबादजनवारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी तुषार जाधव...

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Recent Comments