Home महाराष्ट्र coronavirus in dharavi: करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत 'हा' शिक्षक असा ठरला करोना...

coronavirus in dharavi: करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत ‘हा’ शिक्षक असा ठरला करोना योद्धा – this teacher became corona warrior in hotspot dharavi


मुंबईः आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी याच धारावीत करोनाने थैमान घातले होते. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत जाण्याचं धैर्य कोणात नव्हत. मात्र, एका सामान्य शिक्षकांनं ही करोनाचा धोका असतानाही धारावीची जबाबदारी घेतली. रामकुमार राय बखूबी असं या शिक्षकाचं नाव आहे.

रामकुमार मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मेमध्ये धारावीत करोनानं थैमान घातलं असतानाच तेथील साई रुग्णालयात त्यांची ड्युटी लावण्यात आली. सेंटर मॅनेजर म्हणून कार्यरत होण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. आदेश मिळाल्यानंतर लगेचच रामकुमार रुजू झाले. कोव्हिड सेंटर मॅनेजर म्हणून रुग्णांच्या खाण्या- पिण्याची व्यवस्थापासून ते पीपीई किटचं व्यवस्थापना करण्याचं काम त्यांच्याकडं होतं. तसंच, रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर ते डिस्चार्ज झाल्यानंतर उपलब्ध बेड किती आहेत याची नोंद करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर होती.

वाचाः धारावीकरांसमोर नवा पेच; निर्माण झाले मोठे संकट!

आजमगढ हे त्याचं मुळं गाव आहे. पण त्यांचा जन्म मुंबईतच झाला आहे. शिक्षक म्हणून काम करताना त्यांच्या सहकाऱ्यांना निरनिराळ्या कोव्हिड रुग्णालय व क्वारंटाइन सेंटरमध्ये ड्युटीसाठी पाठवण्यात येईल याची आधीच कल्पना आली होती. त्यांनी तशी मानसिक तयारीही केली होती. धारावीतील शाळेतच शिक्षक म्हणून रुजू झालेल्या रामकुमार यांना १२ मेला धारावीतच साई रुग्णालयात रुजू होण्याचा आदेश आला. त्यानंतर कोणताही विचार न करता ते रुग्णालयात रुजू झाले.

वाचाः नागरिकांची बेफिकिरी; या भागात कडक लॉकडाउन!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments