Home शहरं नागपूर Coronavirus In India : मुस्लिमांपासून दुरावा अयोग्यः मोहन भागवत - coronavirus in...

Coronavirus In India : मुस्लिमांपासून दुरावा अयोग्यः मोहन भागवत – coronavirus in india rss chief mohan bhagwat appeal citizens


नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तबलिघी जमातमुळे निर्माण झालेल्या कथित विचारांवर नागरिकांना सावध केलंय. भागवत यांनी तबलिघी जमातचे नाव न घेता नागरिकांसमोर विचार मांडले. काही लोक करोनाच्या भयाने अथवा सरकार आपल्यावर प्रतिबंध घालेल या रागातून सहकार्य करत नव्हते. मात्र, संघाने तात्काळ जूनपर्यंत सगळे कार्यक्रम बंद केले. जो समाज सहयोग करीत नाही. अविवेकी प्रकार करत आहेत त्याचाही लाभ घेणाऱ्या काही शक्ती आहेत. पण आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. भय अथवा क्रोधाने काही करू नये. तसेच एखाद्यामुळे सगळ्या समाजाला त्यासाठी दोष देणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे योग्य नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.

भारताचे तुकडे व्हायला हवेत, असा विचार करणाऱ्या काही संघटना व त्यावर राजकारण करणारेही आहेत. यामुळे आपल्या मनात सूडाची किंवा बदल्याची भावना निर्माण व्हायला नको. १३० कोटी लोक आपले बांधव आहेत. याच विचाराने या संकटकाळी काम करत रहावं. पण आपल्याला भेदाची, क्रोधाची भावना दूर ठेवून सकारात्मक विचार करावा लागेल, असं आवाहन भागवत यांनी केलंय.

पालघरमधील साधूंच्या हत्येचं दुःख

भागवत यांनी पालघरमधील साधूंच्या हत्येचा निषेध केला. पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येचं आपल्याला दु:ख आहे. निष्पाप साधूंची संशयातून मारून मारून हत्या केली गेली. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांचं काम आहे. पण पोलीस काय करत होते? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

करोनाः कॅन्सर असूनही IPS अधिकारी ड्युटीवर

पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या प…

स्वदेशीचा अवलंब करायला हवा

आपल्याला कुणावर अवलंबून राहणं यापुढे योग्य ठरणार नाही. स्वदेशी वस्तूंच्या विकासावर भर देण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने विकास देशाचा विकास व्हायला हवा. नागरिकांनी वैयक्तीक आणि कौटुंबीक पातळीवर स्वदेशी वस्तुंचा वापर केला पाहिजे. स्वदेशच वस्तू वापरल्या पाहिजेत. विदेशी वस्तुंचा उपयोग कमीत-कमी केला पाहिजे, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं. करोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने याग्ये वेळी आणि तत्परतेने निर्णय घेतले. असं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Recent Comments