Home शहरं कोल्हापूर Coronavirus in kolhapur: Coronavirus In Kolhapur अंत्यसंस्काराला गेलेल्या ६ जणांना करोना; अहवाल...

Coronavirus in kolhapur: Coronavirus In Kolhapur अंत्यसंस्काराला गेलेल्या ६ जणांना करोना; अहवाल वेळेत आला असता तर – 6 test positive after attending covid 19 patients funeral


कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे उपचारासाठी दाखल केलेल्या इचलकरंजीतील रुग्णाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या ५५ वर्षीय यंत्रमाग कामगाराच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या १२ झाली आहे. हा रुग्ण २४ जूनला सीपीआरमधील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून रिक्षाने थेट इचलकरंजीतील घरी गेला होता. दरम्यान, अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्या अन्य एका रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेल्या सहा जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ( Coronavirus In Kolhapur )

वाचा: करोनारुग्णांना अॅम्ब्युलन्स मिळत नाही; सरकारने घेतला मोठा निर्णय

इचलकरंजीतील ५५ वर्षीय यंत्रमाग कामगाराला २२ जून रोजी सीपीआरमध्ये दाखल केले होते. २३ जून रोजी त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर २४ जून रोजी सकाळी त्याने सीपीआरमधील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळ काढला होता. महाराणा प्रताप चौकातून एका रिक्षाने तो थेट इचलकरंजी येथील कुडचे मळ्यातील घरात पोहचला होता. पॉझिटिव्ह रुग्ण सीपीआरमधून पळाल्याचे लक्षात येताच सगळेच हादरले होते. नंतर आरोग्य यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन पुन्हा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रकृती अधिकच बिघडल्याने आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील हा करोनाचा तिसरा बळी आहे, तर जिल्ह्यात बाराव्या करोना बळीची नोंद झाली.

वाचा: मुंबईतील सलून, मंगल कार्यालयांसाठी ‘हे’ आहेत नवे नियम

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेस समजले. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या सहा जणांचे अहवाल बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह आले. यामुळे इचलकरंजीतील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत आज ११ रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या आता ८६६ एवढी झाली असून, यातील ७२० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १२२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

वाचा: ‘कोरोनील’ ही फसवणूक; रामदेव बाबांवर कलम ४२० लावा!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments