Home शहरं कोल्हापूर coronavirus in maharashtra : इराणहून कोल्हापुरात परतलेल्या तरुणाला करोना - coronavirus in...

coronavirus in maharashtra : इराणहून कोल्हापुरात परतलेल्या तरुणाला करोना – coronavirus in kolhapur: 38 year old man return from iran found corona positive


कोल्हापूर: इराणहून परतलेल्या शहरातील नागाळा पार्कातील ३८ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. १९ दिवसांनंतर या तरुणाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो इराणमध्ये असताना करोना पॉझिटिव्ह आढळला होता, असे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचा स्वॅब प्रथम मिरजेला पाठवण्यात आला होता तर पुनर्तपासणीसाठी स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्याच्यासोबतच्या अन्य तिघांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.

रत्नागिरीकरांनी पाळली शिस्त; झाले करोनामुक्त!

जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे होत असताना आणखी एक रुग्ण वाढल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संबंधित तरुण इराणहून राजस्थानला आला होता. तिथे त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तो चौदा दिवसाच्या उपचारानंतर निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याने राजस्थानहून तीन सहकाऱ्यांसोबत इनोव्हातून प्रवास केला. त्यांना शनिवारी पहाटे पाच वाजता किणी टोल नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांचा स्वॅब शेंडा पार्कातील प्रयोगशाळेत तपासण्यात आला. शनिवारी त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्वजण इराणमध्ये अडकलेले होते. यातील एकाची पत्नी या धक्क्याने आठवडाभर आधीच मृत पावली आहे.

राज्य करोनाच्या छायेत; २४ तासांत ८११ नवे रुग्ण

कोल्हापुरात आलेल्यांपैकी एक महिला पेठवडगाव येथील आहे तर अन्य एकजण ज्येष्ठ नागरिक आहे. हे सर्वजण जोधपूरहून राजस्थान सरकारच्या परवानगीने आले होते. हे प्रवासी कोल्हापुरात कुठेही फिरलेले नाहीत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

इराणहून प्रवासाचा इतिहास

इराणमध्ये अडकलेले ४० जण तेहरानहून दिल्लीला आले होते. त्यांना दिल्लीवरून जैसलमेरला १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील काहीजण चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सरकारच्या परवानगीने विविध ठिकाणी गेले. त्यातील चारजण कोल्हापुरात आले. यामधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments