Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: करोनाला कसं हरवायचं?; 'त्या' डॉक्टर महिलेने दिला 'हा' मंत्र...

coronavirus in maharashtra: करोनाला कसं हरवायचं?; ‘त्या’ डॉक्टर महिलेने दिला ‘हा’ मंत्र – it’s possible to beat coronavirus with confidence: dr deepali puri


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना झाला म्हणजे आयुष्य संपले या धास्तीने सध्या अनेक मुंबईकर चिंताग्रस्त आहेत. मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर करोनावर मात करणे शक्य आहे. घाबरू नका, संसर्गापासून दूर राहा, संसर्ग झाला तर भेदरून जाऊ नका असे आवाहन केले आहे, केईएम मधील डॉ. दीपाली पुरी यांनी… पुरी यांनाही करोनाची लागण झाली होती. परंतु, त्या यातून केवळ बाहेरच आल्या नाहीत, तर त्यांनी रुग्णसेवाही सुरू केली आहे.

मूळच्या बीडच्या असलेल्या दीपाली कम्युनिटी मेडिसीन विभागामध्ये ज्युनिअर निवासी डॉक्टर म्हणून २३ ते २७ मार्चपर्यंत काम करत होत्या. त्यांनंतर त्यांनी काही दिवस आयडीएसपी विभागामध्येही काम केले. १ मे रोजी रात्री २ वाजता त्यांना थंडी वाजून ताप आला. हा ताप १०५ एफ.वर पोहोचला. तातडीने हॉस्टेलवरच प्राथमिक उपचार सुरू केले. स्पजिंग करून गोळी घेतल्यानंतर त्या दिवशी ताप कमी झाला. त्यानंतर करोनासाठी स्वॅबची तपासणी करण्यात आली. ३ मे रोजी रात्री ९च्या सुमारास डॉ. अमित भोंडवे यांनी तिला अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.

‘यापूर्वी मी अनेकदा रुग्णवाहिकेतून डॉक्टर म्हणून प्रवास केला होता. पण त्या दिवशी रुग्ण म्हणून प्रवास करताना डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. मात्र अशा परिस्थितीत हिंमत सोडली नाही. रुग्णांचे चेहरे डोळ्यांसमोर आणून लवकरात लवकर करोनामुक्त होण्याचा निर्धार केला’, असे डॉ. दीपाली सांगतात. घरापासून दूर असल्याने करोनावर मात करेपर्यंत आई-वडिलांना यासंदर्भात लगेच काही न सांगण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र आतेभाऊ डॉ. रामेश्वर पुरी हे वैद्यकीय सेवेत असल्याने त्यांना कल्पना दिली. अंधेरीला सेव्हनहिल रुग्णालयामध्ये दीपाली यांना दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. ऋतूजा हडाये यांनी खूप काळजी घेतल्याचे त्या नमूद करतात.

लवकर निदान झाल्यामुळे करोनाचा संसर्गही आटोक्यात आला. ऑक्सिजनची रक्तातील पातळी सुधारली. दोन दिवसांनंतर स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणखी एक स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज देण्यात येणार होता. त्यामुळे सात दिवसांनी डिस्चार्ज मिळाला आणि १४ दिवस विलगीकरण करण्यात आले. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी पालकांना करोनासंसर्ग झाल्याचे सांगताच त्यांना अश्रू अनावर झाले, असे दीपाली यांनी सांगितले.

‘ठेवा सकारात्मक दृष्टिकोन!’

करोनाचे एकही लक्षण असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जितक्या लवकर निदान होईल, तितक्या लवकर उपचार सुरू करून या आजारावर मात करणे शक्य आहे. कोमट पाणी पिणे, गुळण्या करणे, पौष्टिक आहार, फळे खाणे, प्राणायाम करणे व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासह सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करोनावर मात करणे शक्य आहे, असे डॉ. दीपाली आवर्जून सांगतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

Recent Comments