Home महाराष्ट्र coronavirus in maharashtra: करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; 'ही' धोक्याची घंटा तर...

coronavirus in maharashtra: करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; ‘ही’ धोक्याची घंटा तर नाही? – maharashtra reports 5,760 new #covid19 cases, 4,088 recoveries


मुंबईः राज्यात आज ६२ करोना रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ७६० नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता प्रत्यक्षात ही शक्यता खरी होत असल्याचं चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात करोनाची लाट ओसरत होती. मात्र, दिवाळीनंतर ही चित्र पालटलं आहे. करोना मृत्यू आणि नवीन रुग्णसंख्या यांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळं काहीशी चिंता वाढली आहे. आज राज्यात ६२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्याचा मृत्यूदर २.६२ टक्के इतका आहे.

… तोपर्यंत राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ अशक्य, या मंत्र्यानं दिलं आव्हान

दिवाळीनंतर राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेली संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी टाळतानाच, मास्क वापरण्याबाबतही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. आज ५ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ४,०८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,४७,००४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८२ % एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यात ७९ हजार ८७३ अॅक्टिव्ह केस असून राज्यातील विविध रुग्णलयांत उपचार घेत आहेत.

पती फोनवरच म्हणाला ‘तलाक’, पत्नीने दिली पोलिसात तक्रार अन्….

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०१,२०,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,७४,४५५ (१७.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५,२२,८१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?; चंद्रकांत पाटील म्हणतात…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Recent Comments