Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: धोका वाढला! राज्यात करोना रुग्णसंख्येनं ओलांडला १८ लाखांचा टप्पा...

coronavirus in maharashtra: धोका वाढला! राज्यात करोना रुग्णसंख्येनं ओलांडला १८ लाखांचा टप्पा – maharashtra reports 6,406 new covid-19 cases, 4,815 recoveries


मुंबईः राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १८ लाख ०२ हजार ३६५ इतकी झाली आहे. राज्यात आज ८५ हजार ९६३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

करोना विषाणू पुन्हा आपला विळखा घट्ट करु लागला आहे. दिवाळीपूर्वी रोडावत गेलेल्या रुग्णसंख्येनं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा डोकं वर काढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात बाधित्यांच्या संख्येत घट होत होती. त्यामुळं प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नाना यश येत असल्याचं चित्र होते. परंतु, दिवाळी संपत नाही तोच पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आज आरोग्य प्रशासनाने जारी केलेल्या आकडीवारीनुसार राज्यात सहा हजार ४०६ बाधित रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांच्या संख्येनं १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

”ते’ राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख?’

दिवाळीआधी करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक होता. आज मात्र हे चित्र उलटे फिरले आहे. आज ४,८१५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेटही ९२. ५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात करोना रुग्णांचे सत्र वाढत असताना करोना मृतांचा आकडा मात्र गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे. आजही राज्यात ६५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना रुग्णांची संख्या ४६ हजार ८१३ इतकी झाली असून मृत्यूदर २. ६ टक्के इतका झाला आहे.

सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला होता पाठिंबा? नवाब मलिकांनी केला खुलासा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५,२८,६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, पण…; भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

manasi naik wedding: शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात – manasi naik ties the knot with pardeep kharera

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा...

hsc exam 2021: बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा – hsc exam 2021 maharashtra boad gives relief to those students with old subjects

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...

maharashtra gram panchayat election: सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात – congress claim 50 percent of gram panchayat election won in maharashtra

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधित जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. १९० ग्रामपंचायतींत सरपंच...

Recent Comments