Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: पुण्यात माकडांवर 'सार्स कोव-२' लसीचा प्रयोग - coronavirus vaccine...

coronavirus in maharashtra: पुण्यात माकडांवर ‘सार्स कोव-२’ लसीचा प्रयोग – coronavirus vaccine trials on monkeys


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने करोना प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन हाती घेतले असून, या लसीचा प्रयोग माकडांवर केला जाणार आहे. या प्रयोगासाठी वन विभागाकडून संस्थेला ३० माकडे दिली जाणार आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘सार्स कोव- २’ ही लस तत्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता असून, ती उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे, २०२० रोजीच्या पत्रान्वये सरकारला मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश राठोड यांनी दिले आहेत.

अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग न करणे आदी अटी-शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments