Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: राज्यात आज ५१ करोनाबळी, २०३३ नवे रुग्ण; बाधितांची संख्या...

coronavirus in maharashtra: राज्यात आज ५१ करोनाबळी, २०३३ नवे रुग्ण; बाधितांची संख्या ३५ हजारांवर – coronavirus in maharashtra 2033 new covid 19 cases and 51 death reported in state in today


मुंबई: लॉकडाऊनमुळं करोना विषाणूची साखळी तोडण्यात अपयश येत असलं तरी, रुग्णवाढीचा वेग रोखण्यात यशस्वी ठरल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात असतानाच, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी म्हणजे आज, राज्यात २०३३ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ३५ हजारांहून अधिक झाली आहे.

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज, सोमवारी दिवसभरात २०३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं एकूण करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ इतकी झाली आहे. तर ५१ करोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. आज ७४९ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात कुठे, किती रुग्ण? (कंसात मृत्यूची संख्या)

मुंबई महापालिका: २१ हजार ३३५ (७५७). ठाणे: २३० (४), ठाणे महापालिका: १ हजार ८०४ (१८), नवी मुंबई महापालिका: १ हजार ३८२ (२२), कल्याण-डोंबिवली महापालिका: ५३३ (६), उल्हासनगर महापालिका: १०१, भिवंडी-निजामपूर मनपा: ४८ (३), मीरा-भाईंदर मनपा: ३०४ (४), पालघर: ६५ (३), वसई-विरार मनपा: ३७२ (११), रायगड: २५६ (५), पनवेल मनपा: २१६ (११), ठाणे मंडळ, एकूण: २६ हजार ६४६ (८४४). नाशिक: १०६, नाशिक मनपा: ७४ (१), मालेगाव मनपा: ६७७ (३४), अहमदनगर: ६५ (५), अहमदनगर मनपा: १९, धुळे: १२ (३), धुळे मनपा: ७१ (५), जळगाव: २३० (२९), जळगाव मनपा: ६२ (४), नंदुरबार: २५ (२), नाशिक मंडळ, एकूण: १ हजार ३४१ (८३). पुणे: २०४ (५), पुणे मनपा: ३ हजार ७०७ (१९६), पिंपरी-चिंचवड मनपा: १६० (४), सोलापूर: ९ (१), सोलापूर मनपा: ४२० (२४), सातारा: १४० (२), पुणे मंडळ, एकूण: ४ हजार ६४० (२३२). कोल्हापूर: ४४ (१), कोल्हापूर मनपा: ८, सांगली: ४५, सांगली-मिरज कुपवाड मनपा: ८ (१), सिंधुदुर्ग : १०, रत्नागिरी: १०१ (३), कोल्हापूर मंडळ, एकूण: २१६ (५). औरंगाबाद: १६, औरंगाबाद मनपा: ९५८ (३३), जालना: ३६, हिंगोली: १०४, परभणी: ५ (१), परभणी मनपा: २, औरंगाबाद मंडळ, एकूण: १ हजार १२१ (३४). लातूर: ४७ (२), लातूर मनपा: ३, उस्मानाबाद: ११, बीड: ३, नांदेड: ९, नांदेड मनपा: ६९ (४), लातूर मंडळ, एकूण: १४२ (६). अकोला: २८ (१), अकोला मनपा: २४६ (१३), अमरावती: ७ (२), अमरावती मनपा: १०८ (१२), यवतमाळ: १००, बुलढाणा: ३० (१), वाशिम: ३, अकोला मंडळ, एकूण: ५२२ (२९). नागपूर: २, नागपूर मनपा: ३७३ (४), वर्धा: ३ (१), भंडारा: ३, गोंदिया: १, चंद्रपूर: १, चंद्रपूर मनपा: ४, नागपूर मंडळ, एकूण: ३८७ (५). इतर राज्ये: ४३ (११). एकूण: ३५ हजार ५८ (१२४९).

लॉकडाऊन कठोरच; पावसाळ्यापूर्वी करोनावर नियंत्रण मिळवायचंय: उद्धव ठाकरे

Live: महाराष्ट्रात रेड झोनमधील निर्बंध शिथिल नाहीच: उद्धव ठाकरेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments