Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: राज्यात करोनाचे आज ३५ बळी; २४ तासांत ७७१ नवीन...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनाचे आज ३५ बळी; २४ तासांत ७७१ नवीन रुग्ण – coronavirus updates: 771 new covid19 positive cases reported in maharashtra today, taking the total number of cases to 14, 541


मुंबई: महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात ३५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील १८, पुण्यातील सात, अकोला महापालिका परिसरात पाच रुग्णांचा मृत्यूंचा समावेश आहे. त्याशिवाय औरंगाबाद, ठाणे आणि नांदेड शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोना बळींची एकूण संख्या ५८३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा दिली.

मुंबईत करोनामुळे २४ तासांत १८ मृत्यू; ५१० नवीन रुग्णांची भर

गेल्या २४ तासात ७७१ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ इतकी झाली आहे.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करिता निगेटिव्ह आले असून, १४ हजार ५४१ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यत राज्यातून २ हजार ४६५ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ०४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १३ हजार ००६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत असे टोपे म्हणाले.

मुंबईत करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९ हजार ३१० झाली असून, मुंबई महापालिका हद्दीतील मृतांचा एकूण आकडा ३६१ इतका झाल्याचे त्यांनी सांगितले.

३१ मे पर्यंत महाराष्ट्र ग्रीन झोन?; मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

Recent Comments