Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक; आज ५३१८ नवे बाधित, १६७...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक; आज ५३१८ नवे बाधित, १६७ मृत्यू – maharashtra reports 167 deaths and 5318 new covid 19 positive cases


मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा कहर कायम असून आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. दिवसभरात राज्यात करोनाचे ५ हजार ३१८ रुग्ण वाढल्याने त्यासोबत चिंताही वाढली आहे. राज्यात करोनामुळे आणखी १६७ रुग्ण दगावले असून त्यासोबत समाधानाची बाब म्हणजे आज विविध रुग्णालयांतून ४४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ( Coronavirus in Maharashtra )

वाचा: करोनाची धास्ती! विलगीकरण कक्षात युवकाची आत्महत्या

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णवाढीचा वेगही कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ५३१८ नवीन रुग्णांची भर पडली. राज्यात आतापर्यंत ८ लाख ९६ हजार ८७४ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील १ लाख ५९ हजार १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १७.७४ टक्के इतके हे प्रमाण आहे. राज्यात सध्या ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ८४ हजार २४५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

वाचा: करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी केलं मान्य

राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेल्या ८६ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू मुंबई शहरातील आहेत. ठाणे मनपा- १, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी-निजामपूर मनपा- १, वसई-विरार मनपा- १, पनवेल मनपा- १, नाशिक- १, मालेगाव मनपा- १, धुळे- ३, जळगाव- ५, पुणे मनपा- १५, पिंपरी-चिंचवड मनपा- ३, सोलापूर मनपा- १, सातारा- १, कोल्हापूर- १, सांगली- १, औरंगाबाद – १, लातूर मनपा- १, उस्मानाबाद- १ असे अन्य शहरातील मृत्यू आहेत. राज्यात सध्या ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा: ‘लॉकडाऊन’ असताना ‘ती’ महिला साई मंदिरात; फेसबुक लाइव्ह केले!

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (७४,२५२), बरे झालेले रुग्ण- (४२,३२९), मृत्यू- (४२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,६३१)
ठाणे: बाधीत रुग्ण- (३२,७३५), बरे झालेले रुग्ण- (१३,८०२), मृत्यू- (८१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,११३)
पालघर: बाधीत रुग्ण- (४८८०), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७१)
रायगड: बाधीत रुग्ण- (३५१८), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५२८)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५४५), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)
पुणे: बाधीत रुग्ण- (१९,७६१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३५), मृत्यू- (६९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७३२)
सातारा: बाधीत रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण- (७०१), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)
सांगली: बाधीत रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८०९), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२५३६), बरे झालेले रुग्ण- (१४२३), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७१)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३७०३), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४८७)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२८९९), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
धुळे: बाधीत रुग्ण- (९३५), बरे झालेले रुग्ण- (३९९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८०)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (४५८६), बरे झालेले रुग्ण- (२१६७), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९२)
जालना: बाधीत रुग्ण- (४७०), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४४)
बीड: बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
लातूर: बाधीत रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५)
परभणी: बाधीत रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
अमरावती: बाधीत रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)
अकोला: बाधीत रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८६३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)
बुलडाणा: बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१४००), बरे झालेले रुग्ण- (१०२१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,५९,१३३), बरे झालेले रुग्ण- (८४,२४५), मृत्यू- (७२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(६७,६००)

वाचा: करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी केलं मान्य



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli crime: Sangli Crime: उपचारांसाठी डॉक्टरकडे गेला; दवाखाना बंद असल्याचे पाहून काय केलं पाहा! – sangli crime theft in doctors house accused arrested in...

सांगली:शिराळा तालुक्यातील मांगले येथील गंधा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेलेल्या चोरट्याने दवाखाना बंद असल्याचे पाहून दवाखान्यालगत असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी केली. हा धक्कादायक प्रकार...

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Recent Comments