Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक; आज ५४९३ नवे बाधित, १५६...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक; आज ५४९३ नवे बाधित, १५६ मृत्यू – maharashtra reports 156 deaths and 5493 new covid 19 positive cases


मुंबईः राज्यात करोनाचा कहर कायम असून आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. दिवसभरात राज्यात करोनाचे ५ हजार ४९३ रुग्ण वाढल्यानं चिंताही वाढली आहे. राज्यात करोनामुळं आणखी १६७ रुग्ण दगावले असून त्यासोबत दिलासादायक बाब म्हणजे आज विविध रुग्णालयांतून २ हजार ३३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (coronavirus in maharashtra)

वाचाः राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार

राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. रुग्णवाढीचा वेगही कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत राज्यात आतापर्यंत ९ लाख २३ हजार ५०२ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील १ लाख ६४ हजार ६२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १७.८२ टक्के इतके हे प्रमाण आहे. राज्यात सध्या ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ६० हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानांवर कारवाई; मुंबई पोलिसांचा ईशारा

राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेल्या ९६ मृत्यूंपैकी ६४ मृत्यू मुंबई शहरातील आहेत. ठाणे मनपा- २४, जळगाव- ६, जालना- १ आणि अमरावती- १ यांचा समावेश आहे. हे ९५ मृत्यू दैंनदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राज्यात सध्या ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३७ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेल्या ‘या’ महान क्रिकेटपटूंना वाहणार श्रद्धांजली – india, australia players to wear black armbands during...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे...

Recent Comments