Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनामुक्तांची संख्या लाखावर; आज ८०१८...

coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनामुक्तांची संख्या लाखावर; आज ८०१८ रुग्ण झाले बरे – coronavirus updates 8018 patients discharged in maharashtra in a single day


मुंबई : राज्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार गेली असून जुलैच्या सुरुवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून या विभागातून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ( Coronavirus In Maharashtra )

वाचा: ‘एका दिवसात करोनारुग्ण होतो बरा’; होमिओपॅथी मेडिकल सेंटरचा दावा

आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तशाच प्रकारे विक्रमी संख्येन रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून १५ जून रोजी एकाच दिवशी ५०७१, २४ जून रोजी ४१६१ आणि २५ जून रोजी ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

वाचा: आता प्रत्येक रुग्णालयात CCTV; नातलग रुग्णांना पाहू शकणार

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, करोना विरुद्ध लढ्याला धार देण्यासाठी व करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना प्रामुख्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात यश येताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. एकप्रकारे करोनाची राजधानी म्हणूनच मुंबईकडे सध्या पाहिले जात आहे. पालिका आणि सरकार यांच्या समन्वयातून मुंबईत अनेक उपाययोजना राबवण्यात आल्याने तसेच रुग्णांवरील उपचारांसाठी व्यापक व्यवस्था उभी केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. खास करून मुंबई शहरात स्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. आज राज्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांत सर्वाधिक ७०३३ रुग्ण मुंबई मंडळातीलच आहेत.

आणखी १२५ रुग्ण दगावले

राज्यात आज एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.२१ % एवढे झाले आहे. राज्यात आज राज्यात ६३३० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३८ % एवढा आहे.

वाचा: देशात करोनाचे रुग्णसंख्या ६ लाखांवर, पाच दिवसांत १ लाखावर नवे रुग्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments