Home शहरं मुंबई coronavirus in maharashtra: Coronavirus in Maharashtra: राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५...

coronavirus in maharashtra: Coronavirus in Maharashtra: राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५ करोनाबळी, ४८७८ करोनाबाधित – maharashtra reports 245 deaths and 4878 new covid 19 positive cases


मुंबईः राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज राज्यात करोनामृत्यूंच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात २४५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ हजार ८७८ नवे करोनारुग्ण वाढले आहेत. (coronavirus in maharashtra)

राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळं चिंता वाढली आहे. आज राज्यात २४५ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. या पैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहेत तर, उर्वरित १५० मृत्यू मागील कालाधीत आहेत. राज्यातील मृत्यूदर सध्या ४. ४९ इतका आहे. आज राज्यात ४८७८ नव्या करोना रुग्णांच निदान झालं असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७६१ झाली आहे.

ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; ‘हे’ आहेत नवे नियम

आज राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये ५७ रुग्ण मुंबईतील, भिवंडी- ४२, ठाणे मनपा- १५, कल्याण डोंबिवली- २, मीरा-भाईंदर- ४, ठाणे-३, पनवेल-७, पालघर- ५, सोलापूर- ६, औरंगाबाद- ४, पुणे- ३, नाशिक- १ आणि जळगाव- १ यांचा समावेश आहे.

वाचाः तुकाराम मुंढेंचे काय होणार; केंद्रीय मंत्र्याने टाकला ‘लेटर बॉम्ब’!

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या करोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या वर गेली आहे. आज १ हजार ९५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२. ०२ इतके आहे. तर, सध्या राज्यातील विविध रुग्णालयात एकूण ७५, ९७९ अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहे. राज्यात ५,७८,०३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,६६,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,७४,७६१(१८.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Samsung smartphones: सॅमसंगचे हे प्रोडक्ट्स सर्वात स्वस्त खरेदीची संधी, सेलमध्ये या ऑफर्स – samsung smartphones, galaxy watch and tablets on discounted price on amazon...

नवी दिल्लीः सॅमसंगचे नवीन स्मार्टफो खरेदी करायचा असेल किंवा नवीन व्हियरेबल, सर्वात स्वस्त खरेदीच करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स अॅमेझॉनवर सुरू असलेल्या कंपनीच्या फ्लॅगशीप,...

Aurangabad Municipal Corporation: शहरासाठी आठवड्यातून दोन चांगल्या गोष्टी करा! – Aurangabad municipal corporation will has started love Aurangabad campaign under Aurangabad smart city devlopment...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका शहरात 'लव्ह औरंगाबाद' अभियान सुरू करणार आहे. या अभियानात सहभागी होताना प्रत्येक नागरिकाने...

Recent Comments