Home शहरं मुंबई coronavirus in mumbai : करोनाचे मुंबईत तीन हजारावर रुग्ण; आज ७ जणांचा...

coronavirus in mumbai : करोनाचे मुंबईत तीन हजारावर रुग्ण; आज ७ जणांचा मृत्यू – coronavirus in mumbai: 155 more covid19 cases and 7 more deaths reported in mumbai today


मुंबई: महाराष्ट्रात मुंबईमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून आज दिवसभरात करोनाचे १५५ नवे रुग्ण आढळल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या ३ हजार ९० इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूसंख्या आता १३८ झाली आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईत आज करोनाचे ८४ रुग्ण पूर्ण बरे झाले असून आतापर्यंत ३९४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

मुंबई, पुण्यात स्थिती गंभीर; केंद्राची पथकं दाखल

करोनाबाधित रुग्णांच्या आजच्या आकडेवारीत १४ ते १७ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांत झालेल्या चाचण्यांच्या अहवालाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे एकूण १३७ रुग्ण आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, असे पालिकेने स्पष्ट केले.

मुंबई: धारावीत ३० नवे करोनाग्रस्त; एकूण ११ मृत्यू

करोनाने गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर १ रुग्ण वयोवृद्ध होता, असेही नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईत करोनामुळे १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अन्य तपशील पाहिल्यास मुंबईतील विविध रुग्णालयांत आज करोना सदृष्य आजाराची लक्षणे असलेले ३६३ रुग्ण दाखल झाले आहेत. अशा रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ७७६ इतकी झाली आहे.

चिंता वाढली: मुंबईतील ५३ पत्रकारांना करोना

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

येथे जाड सुईने 'टुचुक' केले जाईल…

एक मार्च हा दिवस काळाच्या दंडावर कायमस्वरूपी अन् करकचून टोचून ठेवला गेला आहे, याबाबत आमच्या मनात किंचितही शंका नाही. साक्षात पंतप्रधान नमोजींनी या...

Recent Comments