Home महाराष्ट्र coronavirus in mumbai: करोना चाचणीसाठी मुंबई पालिकेने दिली 'ही' मोठी सवलत -...

coronavirus in mumbai: करोना चाचणीसाठी मुंबई पालिकेने दिली ‘ही’ मोठी सवलत – ‘direct contacts’ does not require a certificate for test


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाग्रस्ताच्या थेट संपर्कात आल्याने विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना यापुढे कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज लागणार नाही. घरीच विलगीकरणात असलेल्या या विशिष्ट व्यक्तींसाठी ही सवलत पालिकेने दिली आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबई शहरात अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्यांचे घरामध्ये क्वारंटाइन केले आहे. मोठ्या प्रमाणात संशयित असलेल्या ठिकाणी पथक पाठवून स्वॅब घेतले जातात. मात्र घरात क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती एकेकट्या वा दोन इमारतींमध्ये दोन कुटुंब अशा प्रकारे राहतात, त्यांना करोना तपासण्यामध्ये अडचणी येतात. या व्यक्तींना खासगी लॅबमध्येही जाण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय प्रमाणपत्र आणणेही शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या व्यक्तींनी थेट करोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याचे कळवून वैद्यकीय तपासणीची गरज असल्याचे स्वयंघोषित केले, तर त्यांना पॅथालॉजीमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची गरज राहणार नाही.

शहरातील अनेक वॉर्डमध्ये दवाखाने सुरू नसल्यामुळे या चाचण्यांसाठी मुंबईकरांना फिरावे लागत होते. अशांचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. मात्र या सुविधेचा दुरुपयोग होऊ नये, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments