Home शहरं मुंबई coronavirus in mumbai: करोना विरोधी लढ्याला बळ; मुंबईत १ हजार खाटांचे रुग्णालय...

coronavirus in mumbai: करोना विरोधी लढ्याला बळ; मुंबईत १ हजार खाटांचे रुग्णालय सुरू – covid hospital of 1000 beds started in bkc


मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एमएमआरडीए मैदानावर करोना बाधितांवर उपचारांसाठी सुमारे १ हजार खाट क्षमतेचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डी.सी.एच.सी.) उभारले आहे. या केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज हस्तांतरण करण्यात आले.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्याकडून या केंद्राचे हस्तांतरण स्वीकारले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

कोविड केअर सेंटर

असे आहे कोविड केअर सेंटर …

> वांद्रे (पूर्व) मध्ये स्थित या केंद्राची क्षमता १ हजार ०२६ खाटांची आहे. पैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. सोबत १० मोबाइल आयसीयू बेड आहेत. सध्या येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत. तर इतर कामकाजासाठी ७ लिपीकदेखील नेमले आहेत. गरजेनुसार आणखी मनुष्यबळ तैनात केले जाईल.

> सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत हे कोविड-१९ केअर सेंटर तयार केले आहे. २ मे रोजी काम सुरू होवून ते १६ मे रोजी पूर्णत्वास आले. देशातील हे पहिले असे खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल) आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.

> येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. करोना बाधित रूग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी रूग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे.

> दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुग्णालयात दिले जाईल. स्वच्छतागृहे, स्नानगृहे यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर, तैनात डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

> महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकाऱ्यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसांत हे कोविड-१९ केअर सेंटर उभारले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, घराकडे परतत असणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रविवारी दोन जणांना अटक केली. दोघा आरोपींना सोमवारपर्यंत (एक मार्च) पोलिस...

redmi note 10 smartphone: Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार – redmi note 10...

हायलाइट्स:Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार 33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीनवी दिल्लीःRedmi...

Garry Sobers: पाकिस्तान गोलंदाजांची धुलाई; फलंदाजाने केला होता हा वर्ल्ड रेकॉर्ड – cricket on this day in 1958 garry sobers scored his then world...

हायलाइट्स:वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांनी आजच्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध ३६५ धावा केल्या होत्यासर्वात कमी वयात त्रिशतक करण्याचा विक्रम आज देखील त्यांच्या नावावर आहेत्यांनी वयाच्या...

Recent Comments