Home शहरं पुणे Coronavirus in pune: बाधितांची संख्या १९ हजारांवर - corona number of victims...

Coronavirus in pune: बाधितांची संख्या १९ हजारांवर – corona number of victims is over 19,000


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी ७८७ एवढे करोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने १९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहर व जिल्ह्यात दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला असून, ३३१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात गेल्या चोवीस तासांत ६०६ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १२३ रुग्ण आढळून आले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये ४५, तर पुणे कँटोन्मेंट बोर्डासह नगरपालिकांमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहर व जिल्ह्यात एकूण ७८७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. परिणामी रुग्णांची संख्या १९ हजार ०२७ वर पोहोचली आहे.

शहरात चाचण्यांची संख्या वाढत असून, शुक्रवारी ३ हजार ३७८ जणांच्या चाचण्या महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटर, खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयात करण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५ चाचण्या झाल्या आहेत. शहरात ३३० रुग्ण गंभीर असून, त्यापैकी ६७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत; तर २६३ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ५ हजार ५७५ सक्रिय रुग्ण नायडू, ससूनसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

पुणे शहर, जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी झाली. त्यापैकी १४ जणांचा मृत्यू शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात झाला आहे. जिल्ह्यातील एका व्यक्तीचा शहरातील रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या ६७९ एवढी झाली आहे.

पुण्यात शुक्रवारची स्थिती

पुणे पालिका नवीन रुग्ण – ६०६

पिंपरी-चिंचवड नवीन रुग्ण – १२३

पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण – १३

पुणे ग्रामीण नवीन रुग्ण – ४५

शुक्रवारी बरे झालेले रुग्ण – ३३१

शुक्रवारचे मृत्यू – १८

एकूण पॉझिटिव्ह : १९,०२७ (पुणे शहर : १४,९२६; पिंपरी-चिंचवड : २,५५०; पुणे ग्रामीण – ६७८; पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : ८७३)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bjp mahila morcha aurangabad: भाजप महिला मोर्चा; कार्यकारणी जाहीर – bjp mahila morcha rural executive committee announced by district president pushpa kale

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादभारतीय जनता पक्ष महिला मोर्चाची ( ग्रामीण) कार्यकारणी जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे यांनी शनिवारी जाहीर केली. यात १४ उपाध्यक्षासह एकूण ७१...

t. Natarajan: आईने मजूरी करुन वाढवलं आणि कष्टाचं फळ मिळालं, लाडक्या लेकाला मिळाले भारतीय संघात स्थान – india vs australia: indian fast bowler t....

सिडनी, India vs Australia : परिस्थिती कशीही असली तरी ती बदलण्याची धमक तुमच्या मनगटामध्ये असते, असे म्हटले जाते. ही गोष्ट आता सत्यात उतरलेली...

Taapsee Pannu movies: फालतू हिरॉईन म्हणणाऱ्या ट्रोलरची तापसीनं केलं बोलती बंद – troll calls taapsee pannu ‘faltu heroine whoम्हणणाऱ्या doesn’t know acting’, actor’s savage...

मुंबई टाइम्स टीमसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यात अर्थात सेलिब्रिटींचं ट्रोल होण्याचं प्रमाण अधिक असतं. काहीजण अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष...

Recent Comments