Home शहरं पुणे Coronavirus in pune: Coronavirus In Pune पुण्यात २४ तासांत ३१ करोनामृत्यू; ३५०...

Coronavirus in pune: Coronavirus In Pune पुण्यात २४ तासांत ३१ करोनामृत्यू; ३५० रुग्णांची प्रकृती चिंताजनक – pune district records 739 new cases 31 deaths


पुणे: पुण्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहर जिल्ह्यात ७३९ नवे करोना बाधित रुग्ण आढळले असून २४ तासांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३५० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे शहरात ५२२ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत १० हजार ४५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोनाच्या विळख्यातून रुग्ण बाहेर येत असल्याचेही समाधान आहे. ( Coronavirus In Pune )

वाचा: राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५ करोनाबळी, ४८७८ नवे रुग्ण

पुण्यात एका दिवसात ४४२ जणांना संसर्ग झाला. तर पिंपरी चिंचवड मध्ये १७३ बाधित झाले आहेत. पुणे ग्रामीण मध्ये ८८ जणांना लागण झाल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. त्या ठिकाणी संसर्ग वाढल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे. पुणे कँटोन्मेंट तसेच नगरपालिका हद्दीत ३६ ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील रुग्णसंख्या १७ हजार २९६ एवढी झाली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या २२ हजार ४२९ पर्यंत पोहचली आहे.

पुण्यात मंगळवारी ३९४९ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. तर ३५० रुग्ण हे गंभीर असून त्यापैकी ५९ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २९१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढीनुसार आयसीयूतील रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या ६ हजार १३४ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर ५२२ रुग्ण एका दिवसात उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत १० हजार ४५१ एवढे रुग्ण बरे झालेले आहेत, ही काहीशी समाधानाची बाब आहे.

वाचा: लॉकडाऊनचा ‘खेळ’; तमाशा लोककलाकारांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

केंद्र आणि राज्य सरकारने १ ते ३१ जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन नागरिकांनी करावे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत संबंधित महापालिका आयुक्त, कँन्टोन्मेंट बोर्डांच्या परिसरात महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आदेश लागू असणार आहेत. ग्रामीण भागासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन नागरिकांनी करावे. अन्यता संबंधितांविरूद्ध भारतीय साथ अधिनियम १९८७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

वाचा: पोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांत ६७ करोनाग्रस्तांची नोंदSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

motorola edge s launched in china: ६ कॅमेऱ्याचा मोटोरोलाचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – snapdragon 870, six cameras motorola edge s...

नवी दिल्लीः Motorola ने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Motorola Moto G 5G नंतर आपला फ्लॅगशिप मोबाइल Motorola Edge S सुद्धा लाँच केला आहे....

Mumbai Azad Maidan Morcha: Pravin Darekar: शेतकरी मोर्चात भेंडी बाजारातील महिला कशा?; ‘या’ नेत्याचा सवाल – women from bhendi bazaar participated in azad maidan...

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीतील आंदोलनावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर...

Farmers Tractor Rally Violence News: ‘ट्रॅक्टर रॅली’ हिंसाचारानंतर १५ गुन्हे दाखल, लाल किल्ल्यात कडक सुरक्षा व्यवस्था – farmers Tractor Rally Violence Heavy Security Inside...

नवी दिल्ली : बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत घडलेल्या हिंसेत एका आंदोलकाचा मृत्यू झालाय तर ८६ पोलीस जखमी झाले...

Recent Comments