Home आपलं जग करियर coronavirus in syllabus: 'हे' राज्य अभ्यासक्रमात आणणार करोनाचा धडा - west bengal...

coronavirus in syllabus: ‘हे’ राज्य अभ्यासक्रमात आणणार करोनाचा धडा – west bengal plans to introduce a chapter on coronavirus in school curriculum


कोविड – १९ विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल राज्याचा शालेय शिक्षण विभाग ‘करोना’ वरील धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट होईल.

शालेय शिक्षण विभागातील अभ्यासक्रम समितीतील एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी अलीकडेच नोवेल करोना व्हायरस आणि आवश्यक ती खबरदारी यासंबंधीच्या माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

‘करोनासंदर्भातील धडा पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही सिलॅबस समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत,’ अशी माहिती अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष अवीक मजुमदार यांनी दिली. प्राथमिकपासून माध्यमिकच्या वर्गांपर्यंत करोना व्हायरससंबंधातील पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती अन्य एका अधिकाऱ्यांनी दिली.

बेसिक हायजिनची माहिती, सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायची खबरदारी अशी माहिती प्राथमिकच्या वर्गांना तर साथीच्या आजारांचे प्रकार, स्वरुपाचा कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्याचा अभ्यास उच्च माध्यमिक वर्गांना असणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

FYJC Online Admission 2020 संकेतस्थळ १ जुलैपासून सुरू

सीए परीक्षा: ऑप्ट आऊटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘पाठाचं कंटेंट काय असेल याविषयी शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त आम्ही डॉक्टर्स, व्हायरॉलॉजिस्ट्स, एपिडेमिऑलॉजिस्ट्स आदींची मतेही घेणार आहोत,’ असं मजुमदार म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK vs RR: IPL 2020: जडेजाची धडाकेबाज फलंदाजी, चेन्नईचे राजस्थानपुढे सन्मानजनक आव्हान – ipl 2020: chennai super kings given 126 runs target to rajasthan...

अबुधाबी, IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदजांना यावेळी चांगला सूर गवसल्याचे पाहायला मिळाले नाही. याला फक्त अपवाद ठरला तो अष्टपैलू रवींद्र...

ssc-hsc re-exams 2020: दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये – ssc-hsc re-exams 2020 to be conducted in november december month, application process started

SSC-HSC Re-Exams 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा यंदा कोविड-१९ संक्रमण स्थिती आणि त्यामुळे पुकारलेल्या...

flowers change colour: फुलं बदलताहेत आपले रंग – flowers change colour

तापमान वाढीमुळे जगाचे पर्यावरण ज्या पद्धतीने बदलत चालले आहे त्याच्याशी सृष्टीतील प्राणी तसेच वनस्पती स्वत:ला जोडून घेऊ लागले आहेत. वाढते तापमान आणि घटते...

Recent Comments