Home महाराष्ट्र coronavirus in thane: Coronavirus In Thane ठाण्यातील करोनामृत्यू आणि बाधितांचा 'हा' आकडा...

coronavirus in thane: Coronavirus In Thane ठाण्यातील करोनामृत्यू आणि बाधितांचा ‘हा’ आकडा झोप उडवणारा! – thane reports highest covid-19 deaths, cases on a single day


ठाणे:ठाणे जिल्ह्यात आज करोनामृत्यू आणि नवे रुग्ण यांचा एका दिवसातील सर्वाधिक आकडा नोंदवला गेला. आज करोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये तब्बल १ हजार ४७३ ने वाढ झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा २६ हजार १४७ वर गेला आहे. तर, दिवसभरात ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून जिल्ह्यात आज अखेरपर्यंत ८८१ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील २४ तासांत कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ३२३ रुग्ण आढळले असून ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांचा आकडा २०० आणि त्यापेक्षा अधिक आहे. ( Coronavirus In Thane )

वाचा: दिवसभरात ४८४१ नवे रुग्ण आढळले; तर १९२ करोनाबाधितांचा मृत्यू

ठाणे पालिका हद्दीतील रुग्णांच्या संख्येने सात हजाराचा टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ९१ झाली आहे. तर गुरुवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २६४ वर पोहचला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील रुग्णांची संख्या ४ हजार ५१५ इतकी असून ९१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे. नवी मुंबईतही रुग्णांची संख्या झपाटयाने वाढू लागली आहे. आतापर्यंत ५ हजार ६२९ (मृत्यू १८९) रुग्ण आढळले आहेत. मिरा-भाइंदरमध्ये २ हजार ७३५ रुग्ण (मृत्यू १२४), उल्हासनगर १ हजार ४०६ (मृत्यू ३६), भिवंडीत १ हजार ४९६ (मृत्यू ९१), अंबरनाथ मध्ये १ हजार ४७७ (मृत्यू ३६), बदलापुरात ६४९ (मृत्यू १४) आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार १४९ (मृत्यू ३६) रुग्ण आढळले आहेत.

ठाणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आतापर्यंत एकूण १२ हजार ८०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

वाचा: राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!

राज्यात ३६६१ जणांची आज करोनावर मात

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांत सर्वाधिक २८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात सर्वाधिक २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००) रुग्णांनी करोनावर मात केली. नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळात २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वाचा: मुंबईच्या डबेवाल्यापर्यंत पोहोचला करोना; पहिल्या डबेवाल्याच्या मृत्यूची नोंदSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

Recent Comments