Home महाराष्ट्र coronavirus in thane: Coronavirus in Thane ठाण्यात करोना रुग्णवाढीचा उच्चांक; CM ठाकरेंनी...

coronavirus in thane: Coronavirus in Thane ठाण्यात करोना रुग्णवाढीचा उच्चांक; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश – covid 19 1332 cases 30 deaths today in thane district cm thackeray takes review


ठाणे:ठाणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच शुक्रवारी दिवसभरात ठाण्यात ३६५ आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये ३५८ इतकी उच्चांकी रुग्णांची वाढ झाली. नवी मुंबईमध्ये २२४ रुग्ण आढळले असून अन्य शहर आणि ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने दिवसभरात जिल्ह्यात नवीन १ हजार ३३२ रुग्णांची भर पडली तर, जिल्ह्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Coronavirus in Thane )

वाचा: आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड लाख पार, १७५ दगावले

शुक्रवारी रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या २७ हजार ४७९ वर गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११ रुग्ण दगावले असून १३ हजार ३७७ रुग्ण बरे झाले आहेत.

ठाणे शहरातीलच एकूण रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ४५६ इतकी झाली असून आतापर्यंत शहरात २६८ रुग्ण दगावले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. या शहरात आतापर्यंत ४ हजार ८७३ रुग्ण आढळले असून ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमधील रुग्णांची संख्या ५ हजार ८५३ वर गेली असून १९४ रुग्ण दगावले आहेत. मिरा-भाईंदर २ हजार ८५५ रुग्ण (मृत्यू १२९), उल्हासनगर १४६८ रुग्ण (मृत्यू ३९), भिवंडी १५८८ रुग्ण (मृत्यू ९४), अंबरनाथ १४९६ रुग्ण (मृत्यू ३७), बदलापूर ६६० रुग्ण (मृत्यू १५) आणि ठाणे ग्रामीण १२३० रुग्ण (मृत्यू ३९) आढळले आहेत.

वाचा: ‘त्या’ पोलिसांच्या कुटुंबीयांना निवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवास!

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्ह्यातील करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्ह्यातील पालिका आयुक्तांची व इतर अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी-मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिकांच्या आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी तपशील घेतला. विशेष म्हणजे मुंबई महापालिका कशा प्रकारे करोनाशी लढा देत आहे, हे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला उपस्थित मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईतील करोना विरुद्धच्या लढाईचे अनुभव सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या व ठाणे निश्चितच करोनावर मात करेल असा विश्वासही व्यक्त केला.

वाचा: एका आठवड्यासाठी ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू

राज्यात दीड लाखावर रुग्ण

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज राज्यात तब्बल ५ हजार ०२४ नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण आढळून आल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर संख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईनंतर आता ठाणे जिल्ह्यात करोनाचा जोर वाढताना दिसत आहे.राज्यात दिवसभरात १७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील, तर उर्वरित ८४ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत, सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ६५ टक्के एवढा आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raju shetti on farmers republic day parade: दिल्लीत शेतकरी संचलनात घातपाताची शक्यता; ‘या’ नेत्याने व्यक्त केली भीती – raju shetti expressed his fear about...

सांगली: सांगलीतून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर विधान केले...

colonel santosh babu: गलवान खोऱ्यात चिन्यांवर तुटून पडलेल्या कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र – gallantry awards galwan valley martyrs colonel santosh babu honoured with...

नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात ( galwan valley martyrs ) चिनी सैनिकांना अद्दल शिकवताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू ( colonel santosh...

Recent Comments