Home विदेश Coronavirus in USA: अमेरिकेत मृत्यू तांडव; करोना बळींची संख्या ६७ हजारांवर -...

Coronavirus in USA: अमेरिकेत मृत्यू तांडव; करोना बळींची संख्या ६७ हजारांवर – coronavirus in usa death toll recorded more than 67 thousand


वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरू मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत मृतांची संख्या ६७ हजारांहून अधिक झाली. मागील २४ तासांमध्ये मिशिगन राज्यात २३२ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या चार हजारांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील काही राज्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये लॉकडाउनच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. शनिवारी मिशिगन राज्यात मृत्यूंचा दर ९.३ टक्क्यांवर पोहचला होता. तर लॉकडाउनच्या विरोधात बंदुका घेऊन काहींनी आंदोलन केले. या राज्यात २८ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. न्यूयॉर्क राज्यात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये ३ लाख १९ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून २४ हजारांहून अधिकजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, न्यूजर्सीमध्ये एक लाख २३ हजार जण बाधित असून ७७०० जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:’ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे करोनाचा धोका!
वाचा: करोनावर मात: बोरीस यांनी डॉक्टरांचे ‘असे’ मानले आभार
अमेरिकेत ११ लाख ६० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, एक लाख ७३ हजार करोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत एक लाखापेक्षा कमी मृत्यू होतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्रयत्न सुरू असून काही ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा:
चीनला पुन्हा चिंता! नव्याने आढळला करोनाचा रुग्ण
किम यांनी उद्घाटन केलेल्या कारखान्यापासून जगाला धोका!
‘एच१बी’धारकांसाठी निर्बंध शिथिल; भारतीयांना दिलासाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments