अमेरिकेतील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अखेर ट्रम्प सरकारने लॉकडाउनचा अंतिम पर्याय स्वीकारला. मात्र, यामुळे अमेरिकेतील २ कोटी २० लाख नागरिकांनी रोजगार गमावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:
अमेरिकेतील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अखेर ट्रम्प सरकारने लॉकडाउनचा अंतिम पर्याय स्वीकारला. मात्र, यामुळे अमेरिकेतील २ कोटी २० लाख नागरिकांनी रोजगार गमावला आहे. नोकरी गमावलेल्यांसाठी अमेरिकी सरकारने २ लाख २० हजार कोटी डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. हे पैसे घेण्यासाठी सरकारी कार्यालयांत गर्दी आहेच, शिवाय हाती पैसाच न उरलेले नागरिक आता अन्नाची पाकिटे वाटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालयातही गर्दी करू लागले आहेत. यापैकीच सर्वात विदारक चित्र अमेरिकेने पाहिले ते ९ एप्रिल रोजी. टेक्सासमधील सॅन अँटोनिओमध्ये फूड बँकेतून अन्न घेण्यासाठी तब्बल १० हजार लोक मोटारी घेऊन रांग लावून होते. याशिवाय पेनसिल्वानियामधील ग्रेटर पिट्सबर्ग कम्युनिटी फूड बँकेसमोरही हीच परिस्थीती होती. येथे अन्नपाकिटांचे वितरण होत असल्याचे समजताच आजुबाजूच्या भागांतील नागरिकांनी या केंद्राची वाट धरली. काही वेळातच सुमारे १ हजार मोटारी ही अन्नपाकिटे घेण्यासाठी रांग लावून उभ्या राहिल्या.
वाचा: महासत्ता हतबल! अमेरिकेत ४० हजार बळी
वाचा:
‘या’ देशाने लॉकडाउन न करता करोनाला दिली मात
मोफत अन्न घेणाऱ्यांमध्ये वाढ
मार्चच्या मध्यापासून अमेरिकेतील फूड बँकेतून अन्न मोफत घेऊन जाणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमधील आठ फूड बँकांतून २२७ टन अन्नाचे गरजूंना वाटप झाले आहे, यावरून तेथील गंभीर परिस्थिती अधोरेखित व्हावी. पेनसिल्वानियातील ३५० केंद्रांवरही अशीच गर्दी होत आहे.
आणखी वाचा:
करोनावरील लस; ‘असे’ सुरू आहेत अहोरात्र प्रयत्न
अमेरिकेला जेरीस आणण्यासाठी करोना व्हायरसची निर्मिती?
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा