Home विदेश Coronavirus in USA : 'होय...करोनाचा संसर्ग हा अमेरिकेवरील हल्लाच' - coronavirus is...

Coronavirus in USA : ‘होय…करोनाचा संसर्ग हा अमेरिकेवरील हल्लाच’ – coronavirus is attack on america said by trump


वॉशिंग्टन : ‘करोनाचा संसर्ग हा अमेरिकेवरील हल्लाच आहे,’ या आरोपाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. करोनासंसर्गामुळे अमेरिकेत ८,५२,००० जण बाधित झाले असून, ४७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. चीनचे नाव न घेता दैनंदिन पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले,

‘आमच्यावर हल्ला केला गेला. हा हल्लाच होता. हा काही अपघाताने पसरलेला फ्लू नाही. १९१७ नंतर कोणीही असे काही पाहिलेले नाही.’ करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कित्येक लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यस्थेवरील राष्ट्रीय कर्जाचा बोजा वाढतो आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मला सर्व गोष्टींची चिंता आहे.

आपल्याला ही समस्या सोडवायची आहे. आपण जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होतो, चीनपेक्षाही मोठी, इतर कोणत्याही देशापेक्षा मोठी. आपण गेल्या तीन वर्षांत ती उभारली होती. त्यांनी (चीन) अचानक येऊ आपल्याला सगळे बंद करण्यास भाग पाडले. आता आपण व्यवहार पुन्हा सुरू करणार आहोत. आपण भक्कम, आणखी भक्कम होऊ, पण त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

वाचा: लॉकडाउनमुळे शिक्षणात गळती, लिंगविषमता वाढणार!


देशभरात नव्या रुग्णांची संख्या घटते आहे, याकडे लक्ष वेधून ट्रम्प म्हणाले, ‘अलीकडेच विकसित झालेले हॉटस्पॉट स्थिरावत आहेत. सारे योग्य दिशेने निघाले आहे. बोस्टनमधील रुग्णसंख्या घटते आहे. शिकागोतील आलेख घटतो आहे. डेट्रॉइटमध्येही फैलाव कमी होत आहे. याचा अर्थ आपण जी आक्रमक धोरणे राबविली ती यशस्वी ठरली. अधिकाधिक राज्यांत हळूहळू आणि सुरक्षितपणे व्यवहार सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा:

करोनाच्या लसीची ब्रिटनमध्ये सर्वात मोठी चाचणी

लॉकडाउननंतर ‘अशी’ घ्यावी लागणार काळजी!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

Recent Comments