Home देश coronavirus india : अडकलेल्या मजुरांना आणताना करोनाही येईलः गडकरी - coronavirus india...

coronavirus india : अडकलेल्या मजुरांना आणताना करोनाही येईलः गडकरी – coronavirus india this is not right time corona will also come with migrant workers says nitin gadkari over yogi adityanaths plan for bringing stranded workers


लखनऊः परराज्यात अडकलेल्या मजुरांना आणि कामगारांना आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केलीय. राजस्थानमधील कोटामधून हजारो विद्यार्थ्यांना आणल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामगार आणि मजुरांना आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. पण योगी सरकारच्या या निर्णयाशी सहमत नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ही योग्य वेळ नाहीए. यावेळी आपल्याला सतर्कता बाळगायला हवीय. स्थलांतरीत मजूर हे एकटे येणार नाही. त्यांच्यासोबत करोनाही येईल, असा इशाराही गडकरींनी दिला आहे.

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एनडीटीव्हा या वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. परराज्यात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी बस पाठवणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. पण आताच्या घडीला आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना आणण्याची ही वेळ नाहीए. करोनाची लागण असलेला एकही नागरिक यातून आला तर उत्तर प्रदेशसमोर मोठं संकट उभं निर्माण होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

सध्या करोनाचे सर्वत्र रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत मजुरांना आणलं गेलं तर ते एकटे येणार नाहीत. त्यांच्यासोबत करोनाही येईल. त्यांना आणलचं जात असेल तर आधी त्यांची चाचणी केली गेली पाहिजे. सध्याची स्थिती बिकट आहे. यामुळे स्थलांतरीच मजुरांनी आहे त्याच ठिकाणी रहावं. त्यांची तिथेच जेवणाची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, असं गडकरींनी स्पष्ट केलंय.

रॅपिड अँटीबॉडी टेस्टवर तूर्तास स्थगिती, सूत्रांची माहिती

लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखाच, काँग्रेसचा सरकार…

योगी सरकारने यापूर्वी ८ हजार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी २५० बसेस पाठवल्या होत्या. एवढचं नव्हे तर दिल्लीच्या सीमेवर जमा झालेल्या मजुरांना पोहोचवण्यासाठी १ हजार बसेस पाठवल्या होत्या. योगी सरकारच्या या निर्णयावर बिहारचे मुख्यमंत्री आणि एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी असहमती नोंदवली होती.

गुड न्यूज! टेस्ट किट्सचे उत्पादन सुरू

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

Recent Comments