Home देश coronavirus india cases update: देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाखावर - coronavirus...

coronavirus india cases update: देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाखावर – coronavirus india cases update worldometer


नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली आणि देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाखावर गेली. अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे देशात करोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या ही १००१६१ इतकी झालीय. ३११४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर ३८९०९ जण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती वर्ल्डमीटर करोना व्हायरसhttps://www.worldometers.info/coronavirus/ या वेबसाइटने दिलीय.

सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला. त्यापूर्वीच महाराष्ट्र, पंजाब या राज्यांनी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला होता. केंद्र सरकारने रविवारी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. तसंच नवी नियमावलीही जाहीर केली. यानंतर आज उत्तर प्रदेश आणि तेलंगणने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचं जाहीर केलं.

देशभरात सोमवारी करोनाचे सर्वाधिक ५२४२ इतके नवे रुग्ण आढळून आले. देशातील करोना रुग्णांची संख्या सोमवारी सकाळी ९६,१६९ इतकी होती. त्यात ३०२९ जणांचा मृत्यू तर ३६८२४ जण करोनामुक्त झाले होते. तर ५६३१६ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र दिवस संपेपर्यंत भारताने करोना रुग्णांचा १ लाखाचा आकडा ओलांडला आहे. सर्वाधिक करोना रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत ११ व्या क्रमांकावर आहे.

जगातील रुग्णसंख्या ५० लाखांजवळ

जागातील करोना रुग्णांची संख्या ५० लाखांजवळ पोहोचली आहे. यापैकी ३१७७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक करोना रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील १५ लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ९१ हजार नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. तिथे २ लाख ९० हजार करोनाचे रुग्ण आहे. त्यापैकी २७२२ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी इतर देशांच्या तुलनेत तेथील मृत्यूदर हा अतिशय कमी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन. स्पेनमध्ये २७७७१९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २७६५० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये २४६४०६ इतके रुग्ण आहेत. तर पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

Recent Comments