Home देश Coronavirus India Lockdown : लॉकडाऊनः पंतप्रधान मोदींची आज 'मन की बात' -...

Coronavirus India Lockdown : लॉकडाऊनः पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’ – coronavirus india lockdown pm modi mann ki baat today at 11 am


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी त्यांचा हा ‘मन की बात’चा कार्यक्रम होतो. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे देशाचं लक्ष असेल.

पंतप्रधान मोदींनी १२ एप्रिलला ट्विट करून उद्या होणाऱ्या ‘मन की बात’साठी काही सूचना मागवल्या होत्या. 1800-11-7800 फोन नंबरवर आपला संदेश रेकॉर्ड करावा किंवा MyGov आणि NaMo अॅपवर संदेश लिहून पाठवावा, असं आवाहन मोदींनी केलं होतं. या वर्षात मोदींचा हा चौथा ‘मन की बात’चा कार्यक्रम आहे.

लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखाच, काँग्रेसचा सरकार…

देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी येत्या सोमवारी २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. या चर्चेत लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेतून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या ‘मन की बात’चा कार्यक्रम होतोय. यामुळे मोदी या कार्यक्रमातून काय संकेत देतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अडकलेल्या मजुरांना आणताना करोनाही येईलः गडकरी

केंद्राची पथकं ‘राजकीय व्हायरस’ पसरवण्यासाठी आली …

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments