Home देश पैसा पैसा Coronavirus India update : फ्लीपकार्टकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत - we welcome the...

Coronavirus India update : फ्लीपकार्टकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत – we welcome the government’s decision of providing gradual relaxations in retail and hope for the safety and security of all stakeholders says flipkart


मुंबईः केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत १५ एप्रिलला जारी केलेल्या आदेशात बदल केला आणि जीवनावश्यक नसलेल्या सामानांची दुकाने काही अटी आणि शर्थींवर सुरू करण्याचे परवानगी दिलीय. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं फ्लीपकार्टने स्वागत केलं आहे.

लकॉडाऊनमध्ये नागरिकांनी संयम दाखवला आहे. पण अशा स्थितीत त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी पूर्ण करणंही गरजेचं होतं. सरकारच्या निर्णयानुसार आता ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करणं सोयीचं होणार आहे. यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आणि उन्हाळ्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या नागरिकांना अनेक वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या सूचनांनुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरक्षितपणे ई-कॉमर्स कंपन्यांकडून नागरिकांना हव्या असलेल्या वस्तू पुरवण्यात येतील. लॉकडाऊनमुळे लघुउद्योगांकडे माल माल पडून आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यावहारांमुळे या उद्योगांवरचा भारही कमी होण्यास मदत होईल. यात सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असं फ्लीपकार्टने म्हटलंय.

अक्षय तृतीया : एका रुपयात सोनं खरेदी करा

फक्त भारतच नव्हे, RBI या देशाची अर्थव्यवस्थाही सावरणार?

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना दुसरीकडे सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारने अलिकडेच घेतलेल्या निर्णयातून हे स्पष्ट होतंय. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राकडून सरकारच्या निर्णयांचे स्वागत आहे, असं फ्लीपकार्टने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments