Home महाराष्ट्र Coronavirus lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाउन नाही; अनलॉक करण्यावरच भर! - there is...

Coronavirus lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाउन नाही; अनलॉक करण्यावरच भर! – there is no lockdown again in the state


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता ‘अनलॉक’च असेल, असे स्पष्टीकरण देत शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकला. करोनाची लस येत नाही तोवर राज्यातील जनतेला सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायजेशन या ‘एसएमएस’ प्रणालीचा अवलंब करूनच साधारण आयुष्य जगावे लागेल, असे त्यांनी सांगितले. राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो, असे आरोप खोडून काढत त्यांनी चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले.

पुणे आणि सोलापूरमध्ये करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक शुक्रवारी पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लॉकडाउन होणार नसल्याचे सांगितले. ‘पुणे, मुंबई आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या ठिकाणी जुलै महिन्यांपर्यंत पुरतील इतक्या बेडची सुविधा आहे. जुलैत आढावा घेऊन पुढील तयारी करण्यात येईल. सध्या करोनाची वाढत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय नसून, मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत. मुंबई आणि पुण्यात दर एक लाख संख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक असल्याने चाचण्या कमी होत आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही. मृत्यूचे आकडे काही प्रमाणात पुढे मागे होत असले तरी सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. विरोधकांनी मागणी केल्यास त्यांना आकडेवारी दिली जाईल,’ असे टोपे यांनी सांगितले.

पुणे, सोलापूर सारख्या महापालिकांनी एक लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्याची तयारी करावी, अशा सूचना देण्यात आल्या असून, चाचण्यांचे अहवाल चोवीस तासांच्या आत येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येणाऱ्या काळात चाचण्यांच्या नव्या पद्धतीवर भर दिला जाईल, याकडेही टोपे यांनी लक्ष वेधले. प्रतिबंधित क्षेत्राचा (कन्टेंमेंट झोन) आढावा घेतला तर मुंबई आणि पुण्यात सुरूवातीपासून प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या परिसरामध्ये आता नवे रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. परंतु, राज्याच्या इतर भागांत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या नागरिकांच्या स्थलांतरामुळे रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

कारवाईचा इशारा

करोनाच्या रुग्णावरील उपचारांसाठी किती दर आकारावेत, यासंदर्भात खासगी रुग्णालयांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी काही खासगी रुग्णालये जादा दर आकारत असल्याचे आढळून आले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार दर आकारले नाहीत तर संबंधित रुग्णांलयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. रुग्णालयांकडून जादाचे दर आकारले जात असतील तर अशा घटना निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टोपे उवाच…

– राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाही

– जुलैपर्यंत राज्यात बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार.

– रुग्णसंख्या वाढ हा कळीचा मुद्दा नाही, तर मृत्यूदर कमी करण्याचे उद्दीष्ट

– रुग्णसंख्या व मृत्यूंची आकडेवारी लपवण्यात आलेली नाही.

– खासगी रुग्णालयांनी जादाचे दर आकारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments