Home मुंबई नवी मुंबई Coronavirus lockdown: लॉकडाऊनमध्ये छुप्या पद्धतीने झालेली शाही हळद भोवली! - surrounded by...

Coronavirus lockdown: लॉकडाऊनमध्ये छुप्या पद्धतीने झालेली शाही हळद भोवली! – surrounded by royal turmeric


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

लॉकडाऊनमध्ये छुप्या पद्धतीने झालेल्या नेरे गावातील हळदी सोहळा आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचा भाऊ आणि नवरीचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथीचा रोग प्रादुर्भाव, आपत्कालीन परिस्थित कायद्याचे उल्लंघन करणे अशा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागतिक साथरोग असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात आणि देशातील जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले. लग्नसोहळा, बैठका, सभा आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असताना पनवेल तालुक्यातील नेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबाला संस्कृतीची परंपरा असलेला हळदी समारंभ साजरा न करण्याचा मोह आवरता आला नाही. पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला हातावर तुरी देऊन १४ जूनला धुमधडाक्यात हळद साजरी केली. करोनाचा संसर्ग झालेल्या नवरदेवाचा भाऊ आणि नेरे ग्रामपंचायतीचा सदस्य असलेल्या जितेंद्र वामन पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघांना करोनाची लागण झाली असून हळदी समारंभात सहभागी झालेल्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. करोनामुळे ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. आपत्कालीन परिस्थिती कायद्याचे उल्लंघन करमे, साथरोग प्रतिबंध आणि भारतीय दंडविधान कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेव जितेश वामन पाटील, नवरदेवाचे वडील वामन सुदाम पाटील, नवरदेवाचा मृत भाऊ जितेंद्र वामन पाटील आणि नवरीचे वडील धनंजय कान्हा पाटील यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेकडो लोक सहभागी झाले असल्याचे सांगितले जात असलेल्या या हळदीत पोलिस तपासात मात्र ३० ते ४० लोक सहभागी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिस तपास सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली. हळद आणि लग्न सोहळ्यात काढलेले फोटो मिळवून दोन्ही ठिकाणी किती लोक उपस्थित होते, याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद पडलेल्या कंपनीत लग्न

नेरे गावात नवरदेवाच्या गावी पार पडलेला हा विवाह सोहळा पनवेल तालुक्यातील देवळोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका बंद कंपनीच्या गोदामामध्ये झाला. त्यामुळे लग्न सोहळ्यात नवरीचे वडीलही सहभागी होत असल्याचे कारण दाखवून नवरीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.

कारवाई कोण करणार?

लॉकडाउनच्या काळात नागरिकांना रस्त्यावर फिरू न देणाऱ्या पोलिसांनी नागरिकांना लाठीचे फटके दिले. मात्र एका गावात पार पडलेला लग्नसोहळा, हळद पोलिसांना कशी कळाली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्तव्यांत कसूर करणाऱ्या संबंधित प्रशासनावर कारवाई कोण करणार हा प्रश्न आहे. पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांना याबाबत विचारले असता आम्ही आजवर १४ विवाहसोहळे होण्यापासून रोखले आहेत. आमचे कर्मचारी इतर ठिकाणी गुंतलेले होते, असे त्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : शरद पवार यांनी केली सिरम संस्थेची पाहणी | News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाब्यात पूर्णाकृती पुतळ्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण सोहळ्याला शरद पवार राहणार उपस्थित फडणवीस, राज ठाकरेही राहणार उपस्थित Source link

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Recent Comments