Home देश Coronavirus lockdown delhi : करोनाः कॅन्सर असूनही IPS अधिकारी ड्युटीवर - coronavirus...

Coronavirus lockdown delhi : करोनाः कॅन्सर असूनही IPS अधिकारी ड्युटीवर – coronavirus lockdown delhi ips officer anand mishra puts coronavirus fight before cancer care


नवी दिल्लीः रुग्णांना करोनामुक्त करण्यासाठी करोना व्हायरसचा डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी २४-२४ तास ड्युटी करत आहेत. तर प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीसही नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र रस्त्यांवर तैनात आहेत. नागरिकांसाठी झटणाऱ्या एका तरुण पोलीस अधिकाऱ्याच्या धैर्याचे संपूर्ण दिल्लीत कौतुक होत आहे.

कॅन्सरकडे न ड्युटीवर

आनंद मिश्रा हे २००९च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिश्रा हे अतिरिक्त पोलीस उपायुक्त असून त्यांच्यावर दिल्ली बाहेरील परिसराची जबाबदारी आहे. मार्चदरम्यान त्यांना घशात वेदना होत होती. ते तैनात आहेत त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. रोज सकाळी जाऊन आनंद हे मजुरांसाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करत होते. काही दिवसांनी त्यांच्या घशातील वेदना आणखी वाढली आणि वाढतच गेली. यानंतर आनंद यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. नंतर थायरॉइड ग्लँड्सवर कॅन्सर आहे हे त्यांना २८ मार्चला लक्षात आलं. २४ एप्रिलला राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे.

कुटुंबीयांनाही कळवलं नाही

कॅन्सर असतानाही आनंद यांनी ड्युटी सुरूच ठेवली. कॅन्सर आणि वेदनांसोबतच ते कर्तव्यही करत राहिले. कुटुंबातील कुणालाही त्यांनी आपल्या आजाराची कल्पना दिली नाही. त्यांना कॅन्सर आहे याची माहिती फक्त दोन जणांना होती. त्यांनी पत्नी आणि त्यांचे मोठे बंधु. कुणालाही सांगू नका नाही तर ते चिंता करतील, असं आनंद यांनी पत्नी आणि मोठ्या भावाला सांगितलं होतं.

पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात

अडकलेल्या मजुरांसाठी राज्यांची आपांपसात चर्चा, गा…

आनंद यांनी पत्नीलाही थांबवलं

आनंद यांच्याकडे जाण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालीय. अशा वेळी त्यांना माझी अधिक गरज आहे. तिथे असती त्यांची काळजी घेतली असती. पण आपणही इकडे ड्युटीवर आहोत. यामुळे शहर सोडून येऊ शकत नाही. आनंद यांनीही येण्यास मनाई केली आहे, असं त्यांची पत्नी आलोक दुबे यांनी सांगितलं. त्याही मथुरामध्ये वरिष्ठ सरकारी पदावर आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ajit pawar: मुख्यमंत्रिपदाचा योग कधी? अजित पवार म्हणाले… – what ajit pawar said on the question regarding cm post

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकारांच्या एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरं जावं लागलं. अर्थात, अजित पवार...

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

Recent Comments