Home देश coronavirus lockdown update: मजुरांनी भरलेला ट्रक पलटला, तीन महिलांचा मृत्यू - coronavirus...

coronavirus lockdown update: मजुरांनी भरलेला ट्रक पलटला, तीन महिलांचा मृत्यू – coronavirus lockdown update uttar pradesh truck ferrying migrants turns over 3 labourers died several injured


लखनऊः उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात स्थलांतरीत मजुरांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ट्रकमध्ये असलेल्या तीन महिलांचा या अपघातात मृत्य झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थाळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. हा अपघात झाशी-मिर्झापूर हायवेवर महुआ वळाणावर झाला.

उत्तर प्रदेशात याआधी औरेयामध्ये भीषण अपघात झाला होता. राजस्थानमधून येत असलेल्या ट्रकला हा अपघात झाला होता. या अपघातात २५ स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी झाले होते.

औरेयातील घटनेनंतर चालत येणारे आणि अवैध ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यांना स्थलांतरी मजुरांना उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली. सीमेलगत असलेल्या भागांमध्ये आणि टोल नाक्यांवर आणि चौकांमध्ये प्रशासनाने स्थलांतरी मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था करावी, असे आदेशही मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी यासोबत दिले होते. तसंच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वेळोवेळी सॅनिटाइज करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही सोमवारी पुन्हा अपघात झाला.

दिल्लीत बससेवा सुरू, एकावेळी फक्त २० प्रवाशांना परवानगी

मुंबईतील मजुराचा मृतदेह सोडून ट्रक चालक पळाला

औरेयामधील अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेल्या मजुरांना एकाच ट्रकमधून झारखंडला पाठवण्यात येत होतं. पण झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरे यांनी या प्रकरणी ट्विट केल्यानंतर यूपीचे प्रशासन जागे झाले आणि मृतदेह वेगळ्या वाहनांमधून पाठवण्यात आले.

यूपीच्या कुशीनगरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला सोमवारी अपघात झाला. या बस अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. बिहारला निघालेल्या बसने कांद्याने भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments