Home शहरं मुंबई Coronavirus mumbai: Covid yoddha: 'कोविड योद्धा' होण्यासाठी २१ हजार अर्ज; पण 'इतक्याच'...

Coronavirus mumbai: Covid yoddha: ‘कोविड योद्धा’ होण्यासाठी २१ हजार अर्ज; पण ‘इतक्याच’ उमेदवारांची झाली निवड


मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा होण्याचं आवाहन केल्यानंतर २१ हजार उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील ३ हजार अर्ज फक्त एकट्या मुंबईतूनच आले. मात्र, तब्बल अडीच महिन्यानंतर मुंबई महापालिकेने त्यातील ५७० उमेदवारांना कोविड योद्धा म्हणून सेवेत रुजू करून घेतले आहे. लालफितीचा कारभार तसेच राज्य सरकार आणि पालिकेतील विसंवादामुळे या नियुक्त्या रखडल्याचं उघड झालं आहे.

कोविड योद्धा होण्यासाठी लागणारा अनुभव आणि त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून ही नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ निवृत्तच नव्हे तर तरुणांनाही कोविड योद्धा बनविण्यात आले आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही सेवेची संधी देण्यात आली असून त्यांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मात्र, कोविड योद्धा होण्यासाठी अर्ज करून दोन महिने उलटले तरी सरकार किंवा पालिकेकडून या उमेदवारांना कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. लालफितीचा कारभार आणि अधिकाऱ्यांचा परस्परांशी नसलेला संवाद त्यामुळे या नियुक्त्या रखडल्या. एवढंच काय ठाणे आणि नवीमुंबईसह कोणत्याही महापालिकेला कोविड योद्ध्यांची भरती करण्याबाबत सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. कोविड योद्ध्यांची भरती करण्यासाठी आम्हाला राज्य सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही कोविड वॉरियर्स नावाची दुसरी योजना सुरू केली. नगरसेवकांच्या मदतीने आम्ही ६०० नॉन मेडिको स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आहे, असं ठाणे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही राज्यस सरकारकडून कोविड योद्ध्यांची नेमणूक करण्यासाठी कोणतेच आदेश किंवा सूचना आल्या नसल्याचं सांगितलं.

सरकारने कोविड योद्ध्यांच्या भरतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने ही प्रक्रिया हाताळण्यात आली, त्यामुळे आम्ही प्रचंड निराश झालो आहोत. मी स्वत: कोविड योद्धा होण्यासाठी इच्छूक असलेल्या ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे अर्ज मुंबई महापालिकेला पाठवले. पण पालिकेने ४० पेक्षा अधिक लोकांना नियुक्त केले नाही. आम्ही वॉर्डनिहाय सेवा देण्याचा प्रस्तावही पालिकेला दिला, मात्र अनेक कारणं देत पालिकेने आमचा प्रस्ताव नाकारला, असं माजी सेवानिवृत्त कर्मचारी चेंबर्सचे संचालक आणि कमांडर अंगसुमन ओझा यांनी सांगितलं.

करोनामुक्त रुग्णांमध्ये आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला धक्का

करोनाचं लक्षण नाही; पण अचानक मृत्यू; नव्या प्रकारामुळे चिंता वाढली

फार्मासिस्ट अनंत वारे यांनी नॉन-मेडिकल कोविड योद्धा म्हणून अर्ज केला होता. त्यांना रायगड जिल्हा प्रशासनाकडून बोलावणंही आलं. मात्र अद्याप त्यांना नियुक्त करून घेण्यात आलेलं नाही. माझी कोविड योद्धा म्हणून नियुक्ती झाली नसली तरी माझ्या पद्धतीने मी समाज कार्य करतच आहे, असं वारे यांनी सांगितलं.

मंत्र्यांना ४६ दिवसात जमलं नाही ते पवारांनी २ तासात करून दाखवलं

दरम्यान, आम्ही ५७० कोविड योद्ध्यांची भरती केली असून त्यातील काही जणांची बीकेसी आणि इतरांची एनएससीआय सेंटरमध्ये नियुक्ती केली आहे. एवढे कोविड योद्धे आमच्यासाठी पुरेसे आहेत. पालिका कर्मचारी ड्युटीवर असताना करोना होऊन दगावल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये भरपाई देण्याची योजना आम्ही आणली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढलं आहे, असं पालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी सांगितलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments