Home शहरं मुंबई coronavirus mumbai update: 'ती' माहिती साफ खोटी! बीकेसीतील कोविड रुग्णालय पूर्णपणे सुरक्षित:...

coronavirus mumbai update: ‘ती’ माहिती साफ खोटी! बीकेसीतील कोविड रुग्णालय पूर्णपणे सुरक्षित: BMC


मुंबई: करोना रुग्णांवर उपचारांसाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) उभारण्यात आलेले कोविड रुग्णालय पूर्णपणे सुरक्षित आहे. निसर्ग चक्रीवादळामुळं या रुग्णालयाची कुठलीही हानी झालेली नाही,’ असा खुलासा मुंबई महापालिकेनं केला आहे.

Live: राज्यातील करोना रुग्णांची संख्या ७५ हजारच्या उंबरठ्यावर

कोकण किनारपट्टीवर काल निसर्ग चक्रीवादळानं धडक दिली होती. हे वादळ प्रत्यक्ष मुंबईच्या किनाऱ्यावर धडकलं नसलं तरी सोसाट्याचा वारा व पावसामुळं मुंबईत बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी झाडं पडली. या वादळामुळं बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची चर्चा होती. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देखील या संदर्भात काही व्हिडिओ शेअर केले होते. असल्या तकलादू सुविधांवर करदात्यांचा पैसा का खर्च केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला होता. या सगळ्या चर्चांबद्दल आज मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅँडलवरून स्पष्टीकरण दिलं आहे. बीकेसीतील कोविड रुग्णालयाचं नुकसान झाल्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. या सगळ्या अफवा आहेत,’ असं महापालिकेनं म्हटलं आहे.

वाचा: जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं ‘ही’ मागणी

‘बीकेसीतील कोविड रुग्णालयाभोवती असलेल्या कुंपणाचं किरकोळ नुकसान झालं आहे. रुग्णालयाच्या बांधकामाला वादळामुळं अजिबात धक्का बसलेला नाही. अगदी आज संध्याकाळपासून इथं उपचार सुरू केले जाऊ शकतात,’ असं महापालिकेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ४० हजारांच्या पुढं गेली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर असल्यानं रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं बीकेसीमध्ये १ हजार खाटांची क्षमता असलेले तात्पुरतं रुग्णालय उभारलं आहे. अतिदक्षता विभागाची सुविधाही या रुग्णालयात देण्यात आली आहे.

वाचा: …तर महाराष्ट्र साखरझोपेत असताना शपथविधी झालाच नसता!

आमदार नीतेश राणे यांनी शेअर केलेला व्हिडिओSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

Recent Comments