Home महाराष्ट्र coronavirus mumbai update: पालिकेचा दणका! मुंबईतील या खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास...

coronavirus mumbai update: पालिकेचा दणका! मुंबईतील या खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास बंदी – Civic Body’s No-Test Order To Mumbai’s Largest Lab Can Hit Covid Battle


मुंबईः मुंबईतील मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेवर चार आठवड्यांसाठी करोना चाचण्या करण्यास महापालिकेनं बंदी आणली आहे. प्रयोगशाळेकडून करोना चाचणीचे आहवाल उशिरानं मिळत असल्यानं मुंबई महापालिकेनं ही कारवाई केली आहे.

मुंबईत करोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळं पालिकेच्या या निर्णयामुळं चाचण्या करण्याचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्यानं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत प्रसंगी, करोनाबाधितांवर उपचार करण्यासही विलंब होतो. त्यामुळं रुग्णांचा मृत्यूही होण्याची भिती आहे. असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

maharashtra times

महानगरपालिकाचे पत्रक

वाचाः मुंबईत आयसीयू बेडची कमतरता; १० दिवसांत मिळणार ३०० बेड

खासगी प्रयोगशाळेनंही अहवाल देण्यास उशीर होत असल्याचं मान्य केलं आहे. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्यानं सध्या मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळं अहवाल येण्यास उशीर होत असल्याचं या प्रयोगशाळेनं म्हटलं आहे. तसंच, करोना चाचण्याचे रिपोर्ट उशीरा येण्याचं प्रमाण कमी असल्याचंही या प्रयोगशाळेनं म्हटलं आहे.

करोना चाचणी केल्यानंतर २४ तासांत अहवाल सोपवण्याचा पालिकेचा नियम आहे. मात्र, प्रयोगशाळेनं मागील दहा दिवसांपासून करोना चाचण्यांचा अहवाल पाठवण्यास दिरंगाई केल्याचा ठपका पालिकेनं ठेवला आहे. ४ जूनला पालिकेनं अहवाल येण्यास उशिर का होत आहे. यासंबधित कारणे दाखवा नोटिस प्रयोगशाळेला धाडली होती. मात्र, प्रयोगशाळेकडून कोणतेही उत्तर न आल्यानं पालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे. पालिकेनं चार आठवड्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास निर्बंध आणले आहेत.

वाचाः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह

मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येनं ५२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, १, ७६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत करोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. तसंच, मृत्यूदरही ३ टक्के आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेनं ३०० आयसीयू बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील १० दिवसांत मुंबईत ३०० अतिरिक्त आयसीयू बेड मिळणार आहेत. सध्या मुंबईत १ हजार आयसीयू बेड आहेत. यात अजून ३०० बेड वाढवण्यात येणार आहेत. सध्या ७,६०० खाटांवर करोना संसर्ग झालेले रुग्णांवर उपचार सुरू आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gujarat: Gujarat: २२ वर्षीय तरुणी वॉकसाठी बाहेर पडली, दुचाकीस्वार आला अन् – 22 year old girl molested by unknown man while evening walk in...

अहमदाबाद: २२ वर्षीय तरुणी इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडली असताना, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत...

नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

म. टा. वृत्तसेवा, पनवेल पनवेलमधील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी प्रभागातील बेकायदा बांधकामाची तक्रार पनवेल महापालिकेत केली म्हणून त्यांना जिवे ठार मारण्याची ...

heavy rain in nashik: सात हजार हेक्टरला फटका – heavy rain hits to rice , tomato, grape’s, vegetable crop in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकपरतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भात, टोमॅटो, मक्यासह द्राक्ष, भाजीपाला आणि काढणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या...

Recent Comments