Home शहरं नाशिक Coronavirus nashik: जिल्ह्यातील मृत्यू दोनशेच्या घरात - two hundred deaths in the...

Coronavirus nashik: जिल्ह्यातील मृत्यू दोनशेच्या घरात – two hundred deaths in the district


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यावर करोना विषाणू फैलावाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. गुरुवारी दिवसभरात शहरासह जिल्ह्यात १३९ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या तीन हजार ३०८ झाली आहे, तर जिल्हाभरात सात जणांचा बळी गेल्याने बळींची संख्या दोनशेच्या घरात गेली आहे. जिल्हाबाह्य ११ जणांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

करोनाचा विळखा गेल्या आठ दिवसांपासून घट्ट होत आहे. मागील आठ दिवसांतच जवळपास एक हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण दीडशे नवे रुग्ण आढळले. त्यात मालेगावचे दोन, उर्वरित जिल्ह्यात ३१, जिल्हाबाह्य ११, तर नाशिक शहरात १०६ रुग्ण आढळले. दिंडोरी, देवळाली, पिंपळगाव, आहेरगाव, सिन्नर, येवला, हलसूल, इगतपुरी, विंचूर आदी भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले. मालेगाव आझादनगर आणि सोयगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

नाशिक शहरात चार, तर पिंपळस निफाड, वडाळी नांदगाव आणि आझाद चौक येवला येथील प्रत्येकी एक असे एकूण सात करोना रुग्णांचा बळी गेला. शहर, तसेच जिल्ह्यात १८ जूनपर्यंत एकूण १४७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद होती. आता हा आकडा १९९ झाला आहे.

परजिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या

नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे दाखल झालेल्या परजिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे. विशेषत: मुंबई, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी दिवसभरात या जिल्ह्यांमधील एकूण १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात मुंबई, धुळे, जळगाव, शहापूर, नंदुरबार, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एक, कुर्ला येथील दोन, तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

करोना अपडेट

१८ जून रोजीची स्थिती- २५ जून रोजीची स्थिती- वाढ

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या – २४०३-३३०८-९०५

नाशिक ग्रामीणमधील रुग्णसंख्या – ४६२-६६०-१९८

नाशिक शहरातील रुग्णसंख्या – ९६०-१५८०-६२०

मालेगाव शहरातील रुग्णसंख्या – ९०३-९६४-६१

जिल्हाबाह्य रुग्णसंख्या – ७८-१०४-२६

जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या – १४९६-१८५४-३५८

जिल्ह्यातील मृतांची संख्या – १४७-१९९-५२

सध्या उपचार घेणारे बाधित – ७६६-१२५३-४८७

जिल्ह्यातील मृत्यू

१८ जून रोजीची स्थिती- २५ जून रोजीची स्थिती- वाढ

नाशिक ग्रामीण – २०-३६-१६

नाशिक शहर – ४८-८१-३३

मालेगाव शहर – ६९-७१-२

जिल्हाबाह्य – १०-११-१Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ajit Pawar: म्हाडातील दलालांची आता खैर नाही!; अजित पवार यांनी केली ‘ही’ सूचना – ajit pawars appeal to lodge a complaint against mhada brokers

पुणे: ‘ म्हाडा ’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 'म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त...

ajit pawar on covid vaccination: Ajit Pawar: अजित पवार करोनावरील लस केव्हा घेणार?; पत्रकारांना मिळालं ‘हे’ उत्तर – will take covid vaccine shot once...

पुणे:करोना बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे...

Recent Comments