Home शहरं जळगाव coronavirus outbreak in jalgaon: केंद्रीय पथक जळगावात; करोनासंबंधी दिले 'हे' निर्देश -...

coronavirus outbreak in jalgaon: केंद्रीय पथक जळगावात; करोनासंबंधी दिले ‘हे’ निर्देश – central panel visit on the further spread of the novel coronavirus in jalgaon


म. टा. प्रतिनिधी, जळगाव: करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी. असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले. जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठक पार पडली. यावेळी अलोने बोलत होते.

वाचाः महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा संसर्ग आणि मृत्यूदराची चाचपणी करण्यासाठी शनिवारी केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली होती. दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या या समितीने जिल्हाधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका, कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन जळगावातील परिस्थिती जाणून घेतली. या समितीकडून दौऱ्याचा सविस्तर अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे.

वाचाः मुंबईच्या समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; किनाऱ्यावर जाण्यास बंदी

या समितीत केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य तथा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक (पुणे) डॉ. अरविंद अलोने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. एस. डी. खापर्डे यांचा समावेश आहे. जळगावात दाखल झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी सुरुवातीला सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. मारूती पोटे, डॉ. मधुकर गायकवाड, नोडल अधिकारी डी. आर. लोखंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थितीत, वाढता संसर्ग तथा मृत्यूदर रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबतची सखोल माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी कोविड रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होणारे वॉर्ड, संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येणारे वॉर्ड तसेच कोरोना चाचणी ज्याठिकाणी होतात, त्या प्रयोगशाळेत देखील प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत नोंदी घेतल्या. जळगावातील कोविड रुग्णालयात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार उपाययोजना होतात किंवा नाही, स्थानिक प्रशासनाची भूमिका याची माहिती समितीच्या सदस्यांनी घेतली. अधिष्ठाता यांच्या दालनात झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण सूचना देखील त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

वाचाः लष्करातून बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यानं केली फसवणूक

प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी ; चाचण्यांबात नाराजी

आढावा बैठका आणि कोविड रुग्णालयात पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी जळगावातील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या नवल कॉलनीत प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या बेपर्वाईचे एक उदाहरण समोर आले. नवल कॉलनीत १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या येथील केवळ २२ जणांच्या चाचण्या केल्याची बाब समोर आली. त्यावर समितीच्या दोन्ही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने किमान दीडशे जणांच्या चाचण्या अपेक्षित होत्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापुढे असे होता कामा नये, अशा कडक शब्दांत सूचनाही केल्या. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी रुग्ण आयडेंटीफाय करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments