Home महाराष्ट्र Coronavirus outbreak in Mumbai: मुंबईत आयसीयू बेडची कमतरता; १० दिवसांत मिळणार ३००...

Coronavirus outbreak in Mumbai: मुंबईत आयसीयू बेडची कमतरता; १० दिवसांत मिळणार ३०० बेड – BMC’s Out Of Icu Bed,Aims To Add 300 In 10 Days


मुंबईः राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येनं ९४ हजारांचा आकडा गाठला आहे. तर, आतापर्यंत ३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या अधिकाअधिक वाढत असताना मुंबईत आयसीयू बेड व व्हेंटिलेटर कमतरता भासत आहे. मुंबई महानगरपालिकेनं ३०० आयसीयू बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील १० दिवसांत मुंबईत ३०० अतिरिक्त आयसीयू बेड मिळणार आहेत. सध्या मुंबईत १ हजार आयसीयू बेड आहेत. यात अजून ३०० बेड वाढवण्यात येणार आहेत. सध्या ७,६०० खाटांवर करोना संसर्ग झालेले रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचाः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह

पोर्टलवर सध्या १०, ४०० खाटा उपलब्ध आहेत. मात्र, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाटा अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येनं ५२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, १, ७६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण दुप्पटीचा वेग मंदावला

मुंबईत करोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. तसंच, मृत्यूदरही ३ टक्के आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. खासगी रुग्णालय, दवाखाने आणि नर्सिंग होममध्ये करोनाची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. असं इक्बाल चहल यांनी सांगितलं.

वाचाः काँग्रेसचे मंत्री का आहेत नाराज? सांगण्यात येतंय हे कारण

७९८ कंटेन्मेंट झोन

करोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात पालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आलं आहे. तर, मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकं कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत.

महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोकं राहतात. तर, पालिकेनं सील केलेल्या इमारतींमध्ये ८लाखांहून अधिक लोक राहतात. या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pankaja Munde Tweet: गुन्हा दाखल झाल्यामुळं पंकजा मुंडे भडकल्या! – pankaja munde tweet after police book her for violating social distance rule

बीड: सुरक्षित वावराचे नियम मोडल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजताच पंकजा यांनी संताप व्यक्त...

realme c17: Realme C17 भारतात येतोय, किंमत कमी, फीचर्स जास्त – realme new smartphone realme c17 to launch in india after diwali check price,...

नवी दिल्लीःरियलमी लवकरच भारतात एन्ट्री लेवल स्मार्टफोन सेगमेंट मध्ये जबरदस्त मोबाइल Realme C17 लाँच करणार आहे. याचे फीचर्स जबरदस्त आहेत. तसेच कॅमेरा क्वॉलिटी...

Recent Comments