Home विदेश coronavirus pandemic: ऑक्सिजन अभावी करोनाबाधित मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती: WHO

coronavirus pandemic: ऑक्सिजन अभावी करोनाबाधित मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती: WHO


जिनिव्हा: जगभरात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून जगभरात दररोज सरासरी एक लाख करोनाबाधित आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. येत्या एक आठवड्यात करोनाबाधितांची संख्या एक कोटींचा आकडा ओलांडणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली.

जगभरातील करोनाबाधितांची संख्याही ९३ लाखांच्या घरात पोहचली आहे. येत्या सात दिवसांत एक कोटी करोनाबाधित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातील संशोधक लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लस कधी येईल हे अनिश्चित आहे. तोपर्यंत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी सौदी सरकारने हज यात्रेवर घातलेल्या निर्बंधांचे त्यांनी स्वागत केले.

वाचा: करोनावर लस: जाणून घ्या कोणत्या लशी आहेत अंतिम टप्प्यात

अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत ऑक्सिजन मशीनची कमतरता आहे. अनेक देशांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचीही कमतरता भासणार असल्याची शक्यता आहे. दर आठवड्याला सरासरी दहा लाख लोकांना करोनाची बाधा होत आहे. त्यामुळे प्रतिदिवस ८८ हजार मोठे ऑक्सिजन सिलेंडर आणि ६.२० लाख क्युबिक मीटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. लवकरच हा आकडा कोटींच्या घरात जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत १४ हजार ऑक्सिजन मशीन खरेदी केली आहे. येणाऱ्या काही दिवसात १२० देशांमध्ये ऑक्सिजन मशीन पाठवण्यात येणार आहे.

वाचा: जगाला करोनाचा नव्हे तर ‘याचा’ अधिक धोका: WHO

अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. माइक रायन यांनी म्हटले की, दक्षिण अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. अनेक देशांमध्ये मागील आठवड्यात करोनाबाधितांचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:जादूई मास्क…करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा करणार!

दरम्यान, जगामध्ये करोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहचण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये जवळपास इतकेच बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया, आफ्रिका खंडात करोनाबाधितांची संख्या आणखी वाढणार असल्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments