Home शहरं ठाणे coronavirus pandemic: करोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सामंत -...

coronavirus pandemic: करोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सामंत – don’t play politics in coronavirus pandemic situation said minister uday samant


सिंधुदुर्गः जिल्ह्यात ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्या घरोघरी वाटण्यात येणार आहेत. वालावलकर ट्रस्टच्या डेरवण रूग्णालयात स्वॅब टेस्ट उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोनासारख्या विषयात तरी विरोधकांनी राजकारण करू नये. राजकारणासाठी निवडणुकीचे मैदान खुले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन सामंत यांनी केलं.

मुंबईतील नागरिकांना गावी जायला कोणीही विरोध केला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांचे जिल्ह्याधिकारी, पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून फक्त गावी येणाऱ्या लोकांना परवानगी देताना मर्यादित प्रमाणात द्यावी, असे म्हटले आहे. पण त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ती वस्तुस्थितीला धरून नाही. सिंधुदुर्गच्या किंवा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात येणाऱ्यांना परवानगी देऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. क्वारंटाइन केलेले लोक जर बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गावी येण्यासाठी परवाने मर्यादित स्वरूपात देण्यात येणार असल्याने आता गावी येणार्‍यांची गर्दी ओसरेल आणि यंत्रणेवर ताण पडणार नाही. जिल्ह्यात आजवर सुमारे २० हजार नागरिक आले असल्याची माहिती सामंत यांनी दिली. आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केल्याबद्दल सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सध्या गावोगावी मुंबईहून आलेल्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. खारेपाटण पुलावर तर खूपच गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. गावोगावी ज्या शाळा इमारती आहेत तिथे पुरेशा सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत गावपातळीवरच्या समितीवर मोठा ताण आला आहे.

चिंताजनक! राज्यात आज २३४७ नवे करोनाग्रस्त; ६३ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, सिंधुदुर्गातील बाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आठ पैकी आता चारच रूग्ण उपचार घेत आहेत. इतर चार जण पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना हा एक दिलासा मिळाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

जीएसटीचा नियमसंभ्रम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीसंबंधी केंद्राने एखादे परिपत्रक काढले, तरी राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा अभ्यास करून त्यातील नियम बदलले...

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

bharat jadhav post for father: खूप रडलो होतो त्या दिवशी… अभिनेते भरत जाधव यांची भावुक पोस्ट – marathi actor bharat jadhav shares emotional post...

मुंबई: मराठी सिने-नाट्य सृष्टीत पहिली व्हॅनिटी घेणारा कलावंत म्हणून मान मिळविलेले अभिनेता भरत जाधव यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांसाठी एक भावुक अशी पोस्ट शेअर...

Recent Comments